व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार
![Shocking! The incident took place when the victim's daughter became pregnant](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/rape_clipart.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेऊन त्याचा व्हिडीओ काढला. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे दागिने तिच्या संमतीशिवाय घेतले. हा प्रकार जुलै 2021 ते 22 डिसेंबर 2021 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला.
राजेंद्र भांगले (रा. पाषाण, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने बुधवारी (दि. 22) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादींसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्याचा व्हिडीओ काढला. ‘जर शारीरिक संबंधास विरोध केला तर व्हिडीओ व्हायरल बदनामी करेन’ अशी आरोपीने महिलेला धमकी दिली. महिलेच्या संमतीशिवाय तिचे 60 हजारांचे नेकलेस, 18 हजारांचे मंगळसूत्र घेऊन महिलेला मारहाण केली. आरोपीने फिर्यादी महिलेला वारंवार व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.