breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पुनावळे येथे राम नवमी उत्साहात; भक्तीभावात रंगला धार्मिक सोहळा!
मंदिर ट्रस्टचा पुढाकार : अखंड हरिनाम सप्ताहसह महाप्रसाद सेवा
![Ram Navami in excitement at Punavale; A religious ceremony filled with devotion!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Punawale-780x470.jpg)
पिंपरी : पुनावळे श्रीराम मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने सालाबाद प्रमाणे श्रीराम नवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. बुधवारी पहाटे काकडा महापूजा आरती संपन्न झाली.
तसेच श्रीराम नवमी निमित्त श्रीराम जन्माचे 10 ते 12 या वेळेत ह.भ.प. गौतम महाराज बेलगावकर यांची सुश्राव्य अशी किर्तनरुपी सेवा संपन्न झाली. त्यानंतर सर्व श्रीराम भक्तांना हा प्रसादाचे आयोजन केले होते.
गुरुवारी सकाळी हभप महावीर महाराज सूर्यवंशी यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाचा समारोप होईल, व अन्नप्रसादाने सांगता करण्यात आली, अशी माहिती श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने राहुल काटे यांनी दिली.