भाजपा युवा मोर्चाचे कृतज्ञतेचे रक्षाबंधन !
![Rakshabandhan of gratitude of BJP Yuva Morcha!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/d0ed57e4-b4ba-4f77-b95d-6bfbdcc14565.jpg)
- राखी बांधून ‘विहिंप’च्या कोरोना योध्यांचा सन्मान !
पिंपरी | प्रतिनिधी
कोरोना काळ हा सर्वांचीच परीक्षा घेणारा होता. मात्र या कठीण काळातही जीवाची पर्वा न करता विश्व हिंदू परिषदेच्या स्वयंसेवकांनी रस्त्यावर उतरून काम केले. याची दखल घेत कोरोना काळात समाजासाठी काम करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या स्वयंसेवकांना राखी बांधून तसेच सन्मानपत्र देऊन भाजपा युवा मोर्चा पिंपरी- चिंचवड शहारातर्फे कृतज्ञतेचे रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
यावेळी विहिंपचे मुंबई व गुजरात क्षेत्र गोरक्षा प्रमुख भाऊराव कुदळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष धनंजय शाळीग्राम,युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य अजित कुलथे, विहिंप चिंचवड विभाग मंत्री नितीन वाटकर, चिंचवड जिल्हा अध्यक्ष शरद इनामदार, चिंचवड जिल्हा कार्याध्यक्ष धनाजीराव शिंदे, चिंचवड विभाग दुर्गा वाहिनी पालक नंदकुमार कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी चिंचवड जिल्हा सहमंत्री धनंजय गावडे, अभिजीत शिंदे, चिंचवड जिल्हा दुर्गावाहिनी संयोजिका प्रज्ञ सावंत, चिंचवड जिल्हा धर्मप्रसार प्रमुख विहिंप अविनाश कदम, बजरंग दल चिंचवड जिल्हा सहसंयोजक सागर चव्हाण, युवराज पाटील, अमोल मोकाशी, हर्षल खैरमोडे, वैभव राऊत, देवेंद्र सुर्वे या कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले. युवा मोर्चा चिटणीस मुक्ता गोसावी, आदित्य कुलकर्णी, युवा मोर्चा उपाध्यक्ष पूजा आल्हाट यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. धनंजय गावडे यांनी सूत्रसंचालन केले. विहिंपचे मुंबई गुजरात क्षेत्र गोरक्षा प्रमुख भाऊराव कुदळे यांनी भाजप युवा मोर्चाच्या उपक्रमाचे कौतुक करत आभार मानले.