शालेय जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेतील राजमाता जिजाऊचे यश
सर्व खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांनी केले विशेष मार्गदर्शन
![Rajmata Jijau's success in school district level judo competition](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/SPORTS-780x470.jpg)
पिंपरी : कावेरीनगर क्रीडा संकुल वाकड येथे शालेय जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत भोसरीतील राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी विविध वजनी गटात 6 सुवर्णपदक, 5 रौप्य पदक व एक कांस्यपदक मिळवित उल्लेखनीय कामगिरी केली. यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त 6 खेळाडूंची शालेय विभागस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे. या सर्व खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार विलास लांडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार अजित गव्हाणे, सचिव सुधीर मुंगसे, विश्वस्त विक्रांत लांडे यांनी अभिनंदन केले.
17 वर्ष मुलांच्या गटात गौरव पाटोळे याने 72 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक, ओंकार हिंगणे, 66 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक, ओम शेटे 48 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक, विकास मंडळ विज्ञान 48 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. 17 वर्ष मुलींच्या गटात आदिती कडुसकर 70 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक, ऋतुजा मार्के 44 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक, वैष्णवी वाघमारे 48 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक, ज्ञानेश्वरी हाके 63 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक प्राप्त केला.
19 वर्षे मुलींच्या गटात सानिया हिप्परगी 44 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक, वैष्णवी शिंगोटे 48 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक, 19 वर्षे मुलांमध्ये वैभव मोहिते 45 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक, ओम जाधव 60 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकाविला.