ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
वीज बील धारकांवर होणारी दंडात्मक कारवाई थांबवावी- गणेश आहेर
![Punishment of electricity bill holders should be stopped- Ganesh Aher](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/ganesh-aaher.jpg)
पिंपरी |
पिंपरी चिंचवड शहरात वीज बील धारकांवर होणारी दंडात्मक कारवाई थांबलीच पाहिजे, अशी मागणी मातोश्री संस्थेचे संस्थापक गणेश आहेर यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली आहे. सध्या मार्च महिना असल्याने शहरात सर्वच ठिकाणी वीज बील न भरणार्यांवर कडक कारवाई तसेच मीटर कट करून दंडात्मक कारवाई सुरू आहे.
शहरभर हि कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वीज कट केल्यानंतर २४० रूपये दंड देखील आकारण्यात येतोय. सर्वसामान्य वीजबिल धारकांची परिस्थिती हाताबाहेर गेली असतांना शहरात तसेच राज्यात वीज ग्राहकांचे अक्षरश: हाल होत आहेत, असे गणेश आहेर यांनी म्हटले आहे.
वाचा- `स्मार्ट बस स्टॉप`च्या निविदेतच मोठा घोळ निविदा रद्द करा; जेष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांची मागणी