Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

BIG NEWS : पिंपरीतील प्रस्तावित माता रमाई स्मारकाच्या उभारणीला चालना!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आयुक्तांना सूचना : आमदार आण्णा बनसोडे यांच्या मागणीवर ‘ऑन दी स्पॉट’ फैसला

पिंपरी | पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागे ‘पीएमपीएमएल’ च्या जागेत पिंपरी-चिंचवडकरांना अभिमान वाटावा असे त्यागमूर्ती माता रमाबाई यांचे स्मारक उभारणीला चालना मिळाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांना तात्काळ कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यानिमित्त बुधवारी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहराचा दौरा केला. यावेळी काही विकासकामांचे भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीतील आमदार आण्णा बनसोडे अजित पवारांसोबत सावलीसारखे दिसत होते.

हेही वाचा    –      पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

पिंपरीतील भीमसृष्टी लगतच्या भूखंडावर त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम प्रलंबित आहे. हे काम तातडीने मार्गी लावण्याच्या मागणीसाठी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक कृती समिती आणि माता रमाई स्मारक समितीसह आंबेडकरी विचारांच्या सर्व घटकांतील कार्यकर्त्यांनी अनेक वर्षांपासून मागणी लावून धरली आहे. मात्र, जागेच्या अडचणीअभावी सदर स्मारकाचे काम रखडले आहे. या स्मारकासाठी ‘पीएमपीएमएल’ची जागा ताब्यात घ्यावी आणि भव्य स्मारक उभारावे, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, महानगरपालिकेच्या विविध विकासकामे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर बोलत असताना आमदार आण्णा बनसोडे यांनी त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत टिपण्णी दिली. त्यावर तात्काळ निर्णय घेत महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी कार्यवाही करावी. पीएमपीएमएलची आवश्यक तेव्हढी जागा ताब्यात घेण्याबाबत प्रस्ताव द्यावा. पीएमपीच्या आयुक्तांना मी संपर्क करतो आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य असे रमाई स्मारक उभा करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळे आंबेडकरी विचारांच्या समाजामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या भव्य स्मारकासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला सूचना केली आहे. पिंपरी-चिंचवडकरांना अभिमान वाटावा, असे भव्य स्मारक उभारण्याकामी आम्ही सातत्त्याने पाठपुरावा करीत आहोत. आता या स्मारकाच्या कामाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.

– आण्णा बनसोडे, आमदार, पिंपरी विधानसभा, राष्ट्रवादी.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button