महिलांसाठी ठोस निर्णयांचे आश्वासन; बचत गटांना बळ देण्यावर भर : कविता भोंगाळे-पाटील
मिशन- PCMC : “महिला सक्षमीकरण आणि विकासाचा ठोस अजेंडा घेऊन मैदानात”

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून, प्रभाग क्रमांक ५ गवळणीनगर–चक्रपाणी वसाहत येथे भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार कविता भोंगाळे-पाटील यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ सोसायटीमध्ये महिलांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कविता भोंगाळे-पाटील यांनी महिलांच्या प्रश्नांवर ठोस पावले उचलण्याचे आश्वासन देत महिला सक्षमीकरणासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. विशेषतः बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – वाकड-ताथवडे-पुनावळेत परिवर्तनाची लाट; भाजप उमेदवार श्रुती वाकडकर यांचा झंझावाती जनसंपर्क

यावेळी बोलताना कविता भोंगाळे-पाटील म्हणाल्या की, “आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी मी काम करणार असून, महिलांचे प्रश्न, सुरक्षितता आणि स्वावलंबन हे माझ्या कार्याचे केंद्रबिंदू असतील.”
महिलांनी परिसरातील मूलभूत सुविधा, सुरक्षितता, आरोग्य आणि रोजगाराच्या संधींबाबत आपल्या अपेक्षा मांडल्या. त्यांच्या सकारात्मक आणि विकासाभिमुख भूमिकेमुळे उपस्थित महिलांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. प्रचारादरम्यान विविध भागांतून मिळणारा वाढता पाठिंबा पाहता, प्रभाग क्रमांक ५ मध्ये आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचा ठोस आराखडा घेऊन मैदानात उतरलेल्या कविता भोंगाळे-पाटील यांची उमेदवारी अधिक भक्कम होत असल्याचे चित्र आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“महिलांचे सक्षमीकरण, बचत गटांचे बळकटीकरण आणि प्रभागातील सर्वांगीण विकास हेच माझे प्रमुख ध्येय आहे. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाला पात्र ठरणारे काम मी प्रामाणिकपणे करेन.”
— कविता भोंगाळे-पाटील, उमेदवार, भाजपा, प्रभाग- 5.




