वाकड-ताथवडे-पुनावळेत परिवर्तनाची लाट; भाजप उमेदवार श्रुती वाकडकर यांचा झंझावाती जनसंपर्क
लढणार आणि बदल घडवणार’चा निर्धार; सोसायट्यांमध्ये नागरिकांशी थेट संवाद आणि समस्या निवारणाचे आश्वासन

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, प्रभाग क्रमांक २५ ‘क’ मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार श्रुती राम वाकडकर यांनी आपल्या प्रचाराचा धडाका लावला आहे. वाकड, ताथवडे आणि पुनावळे या भागातील विविध सोसायट्यांमध्ये जाऊन त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्यांनी केवळ आश्वासनं न देता, स्थानिक समस्या समजून घेऊन त्या लवकरात लवकर सोडवण्याचा शब्द दिल्याने सर्वच स्तरातून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रचारादरम्यान श्रुती वाकडकर यांचा दांडगा जनसंपर्क दिसून येत आहे. त्यांच्या रॅली आणि बैठकींमध्ये तरुणांचा वाढता उत्साह, ज्येष्ठ नागरिकांनी दिलेले आशीर्वाद आणि महिला वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग यांमुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. “जनतेचा प्रेमळ प्रतिसाद आणि वाढता पाठिंबा पाहता, आपण १०० टक्के निवडून येऊ,” असा ठाम विश्वास वाकडकर यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा – पिंपळे सौदागरमध्ये भाजपाच्या इच्छुक उमेदवारांचा पक्षनिष्ठेचा आदर्श!
विकासाचा ‘रोडमॅप’ आणि प्रमुख आश्वासने
श्रुती वाकडकर यांनी प्रभागातील प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले असून, त्यांनी नागरिकांना खालील प्रमुख कामांचे आश्वासन दिले आहे:
पाणी आणि रस्ते:- प्रभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था प्राधान्याने दूर करणार.
महिला सुरक्षा व आरोग्य: -महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी ठोस उपाययोजना राबवणार.
सर्वांगीण विकास: -आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असा आदर्श प्रभाग घडवण्याचा ध्यास.
प्रचारात या ५ गोष्टी ठरतायत जमेची बाजू
१. विकासाभिमुख दृष्टीकोन: भविष्यातील गरजांचे योग्य नियोजन.
२. संघटनात्मक अनुभव: प्रदीर्घ समाजकार्याचा दांडगा अनुभव.
३. थेट संवाद: समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची वृत्ती.
४. स्थानिक प्रश्नांची जाण: प्रभागातील प्रत्येक गल्ली आणि समस्येची सखोल माहिती.
५. महिला नेतृत्व: महिलांच्या प्रश्नांना खंबीरपणे वाचा फोडणारे नेतृत्व.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“प्रभागातील महिलांशी संवाद साधताना त्यांचे आरोग्य आणि घरगुती प्रश्न गंभीर असल्याचे जाणवले. या समस्यांवर केवळ आश्वासने न देता ठोस उपाययोजना करण्याचे मी त्यांना वचन दिले आहे. जनतेचा हा उत्स्फूर्त प्रतिसादच माझ्या विजयाची पोचपावती आहे.”
— श्रुती राम वाकडकर (उमेदवार, प्रभाग २५ क, भाजपा)




