Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

‘पीसीसीओइ’मधील “दुर्गवेध ३.०” स्पर्धांचा बक्षीस वितरण

शिक्षण विश्व : किल्ला बनविणे स्पर्धा, रीळ स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, षोडसूत्र स्पर्धा

पिंपरी- चिंचवड : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) निगडी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि युनिट ए – ०५३ यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा, शौर्य आणि दूरदृष्टी या विषयावर आधारित “दुर्गवेध ३.०” या आंतर महाविद्यालयीन भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि पीसीसीओइचे संचालक व प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी, एसडीडब्ल्यू प्रमुख डॉ. पद्माकर देशमुख, असोसिएट प्रमुख प्रा. राजकमल सांगोले, समन्वयक व एनएसएस विभाग अधिकारी डॉ. संदीप जगदाळे आदी उपस्थित होते त्यांनी विजेत्या संघाचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा ‘रोडमॅप’ तयार!

यावेळी किल्ला बनविणे स्पर्धा, रीळ स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, षोडसूत्र स्पर्धा, दुर्ग रहस्य स्पर्धा मधील विजेत्यांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी एनएसएस स्वयंसेवकांनी शौर्य आणि नेतृत्व करणारी ऐतिहासिक एक नाटिका व पारंपारिक लेझीम सादर केले. किल्ला प्रदर्शन या स्पर्धा ऐतिहासिक किल्ल्यांच्या स्थापत्य प्रतिमा, धोरणात्मक नियोजन आणि अभियांत्रिकी उत्कृष्टता यावर आधारित होत्या.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे…

किल्ला बनवणे परीक्षक फेरी प्रथम क्रमांक – टीम शिलेदार, द्वितीय क्रमांक – टीम शिवतेज आणि तृतीय क्रमांक – टीम शिका क्षितिज आणि टीम शक्ती यांना रोख १५ हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. किल्ला बनविणे प्रेक्षक व सार्वजनिक मतदान फेरी मध्ये प्रथम क्रमांक – टीम शौर्यसेना, द्वितीय क्रमांक टीम – शिवद्रग्ज आणि तृतीय क्रमांक टीम – मावळे यांना रोख १० हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. षोडसूत्र स्पर्धेत प्रथम क्रमांक – टीम सिंधुदुर्ग स्टॉर्म्स (वेणू मोरे, पंकज भगत, सोहम शहापुरे, भूमी मुथा), द्वितीय क्रमांक – टीम शिवनेरी शिलेदार (महेश महादू आव्हाड, सुयोग सुहास जाधव, प्रतीक भागवत जाधव) आणि तृतीय क्रमांक – टीम धुरंदर (शामल दिघोळे, निष्ठा पारवे, अपूर्व सगरे, आदर्श भुशिंगे) यांना रोख ८ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. दुर्ग रहस्य स्पर्धेत प्रथम क्रमांक – संघ स्वराज्य, द्वितीय क्रमांक – चकार शिवबाचे आणि तृतीय क्रमांक टीम – एसपीडीपी यांना रोख ४,५०० रुपयांचे बक्षीस देण्यात आले. रांगोळी स्पर्धेतील प्रथम क्रमांक – चंचल वर्मा, द्वितीय क्रमांक – सिद्धिका पुजारी, स्नेहा माळी आणि तृतीय क्रमांक – अदिती बंडगर यांना रोख ४,५०० रुपयांचे बक्षीस देण्यात आले. रीळ बनवणे स्पर्धेत प्रथम क्रमांक – समर्थ पाटील, द्वितीय क्रमांक – युवराज चिलवंत आणि तृतीय क्रमांक – अथर्व राऊत यांना रोख ४,५०० रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button