Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राज्यस्तरीय मराठी अभिवाचन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २८ फेब्रुवारीला

व्ही. के. माटे हायस्कूल येथे आयोजन; किरण यज्ञोपवीत प्रमुख पाहुणे तर नगरसेवक मंदार देशपांडे यांची उपस्थिती

पिंपरी-चिंचवड :  मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन व अभिव्यक्ती कौशल्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने, मोरया शिक्षण संस्था यांच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन आंतरशालेय मराठी अभिवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, जवळपास २५० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या यशस्वी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा –  शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृतीबाबत डॉक्टरांनी काय दिली माहिती?

कार्यक्रमाचे तपशील पुढीलप्रमाणे :
📅 दिनांक : २८ फेब्रुवारी
⏰ वेळ : दुपारी ३.०० वाजता
📍 स्थळ : व्ही. के. माटे हायस्कूल

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. किरण यज्ञोपवीत (प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक, लेखक व माजी विद्यार्थी) यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच आपले माजी विद्यार्थी व नवनिर्वाचित नगरसेवक श्री. मंदार देशपांडे यांचीही उपस्थिती सत्कारमूर्ती म्हणून लाभणार आहे.

तसेच विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट सादरीकरण आणि मान्यवरांचे मार्गदर्शन अनुभवण्याची संधी लाभणार आहे. आपण उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती. आपली उपस्थिती आम्हाला निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

निमंत्रक :
कार्यवाह
मोरया शिक्षण संस्था

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button