प्रियदर्शनी शाळेचा दहावीचा शंभर टक्के निकाल
शिक्षण विश्व: आळंदी येथील प्रियदर्शनी शाळेच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी

पिंपरी चिंचवड : आळंदी येथील प्रियदर्शनी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले. या परीक्षेमध्ये शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे.
शाळेच्या सीईओ सरिता सिंग याबाबत म्हणाल्या, यंदा शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांचे हे यश आकाशाला गवसणी घालण्यासारखे आहे. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मिळालेले हे यश विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमांचे, शिक्षकांच्या सततच्या मार्गदर्शनाचे आणि पालकांच्या विश्वासाचे फलित आहे.
आळंदी येथे प्रियदर्शनी शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे शाळेमध्ये वैयक्तिक लक्ष दिले जाते. विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयासंदर्भात अडचण आल्यास शिक्षक वैयक्तिक रित्या त्यामध्ये मदत करतात. दहावी बोर्डाची परीक्षा एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. विद्यार्थ्यांचा हा बेस मजबूत करण्याचे काम शाळेमध्ये केले जाते. यामध्ये कोणत्याही प्रकारची उणीव भासू नये हाच नेहमी शाळेचा प्रयत्न असतो असे देखील सरिता सिंग यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – चाकणमधील ‘त्या’ पीडीतेचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा
विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये 90 टक्के होऊन अधिक गुण मिळवलेले सहा विद्यार्थी आहेत. तर 80 टक्के गुण मिळवलेले 21 विद्यार्थी आहेत.70 ते 60 टक्क्यांमध्ये 24 विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे.