पिंपरी / चिंचवड
लैंगिक अत्याचार केल्याने अल्पवयीन मुलगी गरोदर
पिंपरी l प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याने अल्पवयीन मुलगी नऊ आठवड्यांची गर्भवती राहिली. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2019 ते 22 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये केंद्रीय विहार जवळ, मोशी येथे घडली.
मयूर गायकवाड (वय 21, रा. आळंदी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने बुधवारी (दि. 20) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गायकवाड याने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिचा वारंवार पाठलाग केला. तसेच तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने तिच्यासोबत शाररिक संबंध प्रस्थापित केले. यातून ती नऊ आठवड्यांची गर्भवती राहिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.