Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भाजपा गटनेतेपदी प्रशांत शितोळे!

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची गट नोंदणीस मान्यता

भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची माहिती

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये भारतीय जनता पार्टीचे एकूण ८४ नगरसेवक निवडून आले आहेत. या सर्व नगरसेवकांची बैठक दि. ३० जानेवारी २०२६ रोजी पार पडली. या बैठकीत सोबत जोडलेल्या यादीनुसार नमूद केलेल्या नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टी गटास एकत्रित मान्यता देत एकमताने ठराव मंजूर केला आहे, तसे पत्र महापालिका प्रशासनाला पाठवले आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिली.

शुक्रवारी झालेल्या बैठकीला आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे यांच्यासह कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका भारतीय जनता पार्टी गट’ या नावाने अधिकृत गट स्थापन करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच प्रभाग क्रमांक ३२-ड मधून निवडून आलेले नगरसेवक प्रशांत कृष्णराव शितोळे यांची भाजपा गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.

हेही वाचा    :          माणसापेक्षा खुर्ची महत्वाची; उपमुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवर मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य

सदर गटाची नोंदणी विभागीय आयुक्त, पुणे तसेच आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडे करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यानुसार भारतीय जनता पार्टीच्या ८४ नगरसेवकांच्या ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका भारतीय जनता पार्टी गट’ नोंदणीस भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पक्षाची अधिकृत मान्यता दिली आहे. भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी नवनिर्वाचित गटनेते प्रशांत शितोळे यांचे अभिनंदन केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

“पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा ८४ नगरसेवकांचा भक्कम गट स्थापन झाला असून, गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची एकमताने निवड ही पक्षातील संघटनात्मक एकजुटीचे प्रतीक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली हा गट शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक प्रशासनासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी ठामपणे काम करेल.”

– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button