breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पूजा खेडकर कुटुंबियांची थर्मोव्हेरिटा प्रा. लि कंपनी सील

पिंपरी : तळवडे येथील खेडकर कुटुंबाशी संबंधित असलेली आणि पालिकेचा कर थकविल्याबद्दल वादग्रस्त कंपनी थर्मोव्हेरिटा प्रायव्हटे लिमिटेडला महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने शु्क्रवारी (दि.19) सील ठाेकले आहे. या कंपनी संचालकाकडे महापालिकेचा दोन लाख 77 हजार रूपयांची कराची थकबाकी आहे.

तळवडे गावठाण, ज्याेतिबानगर येथे थर्मोव्हेरिटा प्रायव्हटे लिमिटेड ही कंपनी आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाशी निगडीत आहे. त्यामुळे कंपनी वादाच्या भोव-यात अडकली आहे. कंपनी म. दि. खेडकर यांच्या नावे आहे. महापालिकेने यासंदर्भातची सर्व कागदपत्रे तपासली आहेत.

हेही वाचा – Ground Report । अजित गव्हाणेंची ‘एन्ट्री’ अन्‌ राष्ट्रवादीत अंतर्गत कलहाची ‘तुतारी’

कंपनीमार्फत 2009 पासून व्यावसायिक कर भरला जात होता. शेवटचा कर 2022 मध्ये भरण्यात आला. त्यानंतर कर भरला नाही. कंपनीकडे दोन लाख 77 हजार 781 रूपयांचा कर थकविला आहे. त्यामुळे नियमानुसार मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने करण्यात आली. कारवाईवेळी प्रशासन अधिकारी नाना माेरे, एल. एम काळे संबंधित गटलिपिक, एमएसएफ जवान उपस्थित हाेते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button