ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PMRDA: ‘पीएमआरडीए’ घरकुलांची बुधवारी सोडत!

एकूण १,०२९ सदनिकांसाठी ५,३१७ अर्जदार पात्र : आकुर्डीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात होणार प्रक्रिया

पिंपरी-चिंचवड | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पेठ क्रमांक १२ आणि ३०-३२ मधील गृहप्रकल्पातील शिल्लक १,०२९ सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. बुधवारी (८ एप्रिल २०२६) सकाळी ११ वाजता आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात ही सोडत पार पडणार आहे. या प्रक्रियेत ५,३१७ पात्र अर्जदारांचे भवितव्य ठरणार असून, ‘पीएमआरडीए’ने याची सर्व तयारी पूर्ण केली आहे.

या गृहयोजनेसाठी एकूण ५,३६७ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला होता. अर्जांच्या छाननीनंतर ५० अर्जदारांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित ५,३१७ अर्जदार आता या सोडत प्रक्रियेत नशीब आजमावतील.

ही सोडत प्रक्रिया ‘म्हाडा’ने विकसित केलेल्या ‘IHLMS २.०’ या संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहे. यात मानवी हस्तक्षेपास वाव नसल्याने प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असेल, असे ‘पीएमआरडीए’च्या सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता यांनी स्पष्ट केले. महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि ‘पीएमआरडीए’च्या सनियंत्रण समितीच्या देखरेखीखाली ही सोडत पार पडणार आहे.

होही वाचा       :                ‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार!

सदनिका आणि पात्र अर्जदारांची स्थिती :

  • पेठ क्र. १२ (EWS): ८१ सदनिकांसाठी २,१८२ अर्जदार
  • पेठ क्र. १२ (LIG): ३९३ सदनिकांसाठी १,९७५ अर्जदार
  • पेठ क्र. ३०-३२ (EWS): ३२७ सदनिकांसाठी ४५६ अर्जदार
  • पेठ क्र. ३०-३२ (LIG): २२८ सदनिकांसाठी ७०४ अर्जदार

थेट प्रक्षेपणाची सुविधा :

सोडत प्रक्रियेवेळी इच्छुक अर्जदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘पीएमआरडीए’ने केले आहे. ज्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नाही, त्यांच्यासाठी थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली आहे. या प्रक्रियेची ‘यूट्यूब लिंक’ (YouTube Link) सर्व पात्र अर्जदारांना एसएमएसद्वारे पाठविण्यात येईल, अशी माहिती ‘पीएमआरडीए’कडून देण्यात आली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button