ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

एकात्मिक विकासासाठी पीएमआरडीए अन्‌ पीसीएमसी एकसाथ!

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भूमिका

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात आढावा बैठक

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

“पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसराच्या एकात्मिक विकासासाठी दोन्ही संस्थांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बैठकीत केले.

आकुर्डी येथील पीएमआरडीए मुख्यालयाला पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा पीएमआरडीएचे अतिरिक्त पदभार असलेले डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी (दि. १५ एप्रिल) भेट देत विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. महापालिका आणि प्राधिकरण यांच्यातील सामायिक विकास प्रकल्पांना गती देणे आणि समन्वय अधिक मजबूत करणे यावर त्यांनी विशेष भर दिला.

हेही वाचा      :          पुण्यातील ‘भाग्यलक्ष्मी प्रॉपर्टीज’ला उच्च न्यायालयाचा दणका    

यावेळी अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे, सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता, उपायुक्त हिंमत खराडे, मुख्य अभियंता रिनाज पठाण, विकास परवानगी विभाग संचालक अविनाश पाटील, मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, मुख्य वित्तीय नियंत्रक जितेंद्र कोळंबे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संयुक्त प्रकल्पांमध्ये सुसूत्रता आणणार..!

या आढावा बैठकीत अभियांत्रिकी विभागामार्फत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. प्रलंबित कामांचा आढावा घेताना, प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन विकासकामे वेगाने पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश डॉ. सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांना दिले. बैठकीत प्रकल्प समन्वय सुधारण्यावर विशेष चर्चा झाली. पीएमआरडीए आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त प्रकल्पांमध्ये सुसूत्रता आणून त्यांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button