‘PMPML’च्या फिरत्या पास केंद्राला उत्तम प्रतिसाद
अवघ्या तीन दिवसांत १ कोटी २९ लाख ७५ हजार ७६० रुपये उत्पन्न

पिंपरी-चिंचवड | पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) पास विभागाला दिनांक ५ ते ७ या तीन दिवसात पास विभाग केंद्र आणि फिरते पास केंद्र या दोन्हींचे मिळून १ कोटी २९ लाख ७५ हजार ७६० रुपये उत्पन्न मिळाले आहे.
सकाळी आणि दुपारी दोन्ही सत्रातील हडपसर, स्वारगेट, निगडी, कात्रज, भोसरी, पुणे मनपा व वाघोली या पास केंद्रावरून हे उत्पन्न मिळाले आहे. फिरते पास केंद्र राधा चौक, एसएनडीटी कॉलेज मेट्रो स्टेशन, तळेगाव ढमढेरे येथे उभे करण्यात आले होते.
हेही वाचा : ‘PMRDA’च्या २९ सेवा आता ‘ONLINE’, आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांचे परिपत्रक जारी
फिरते पास केंद्र योजनेविषयी..
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या संकल्पनेतून फिरते पास केंद्र ही योजना २०२५ मध्ये सुरु झालेली आहे. फिरत्या पास केंद्राची व्यवस्था… पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रात ६ ठिकाणी असणार आहे. सोमवार ते शनिवारपर्यंत सकाळी ७.३० ते १.३० यावेळेत फिरते पास केंद्र कार्यरत असेल. ऑनलाईन व रोख दोन्ही पद्धतीने इथे पास काढता येईल.




