ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘PMRDA’च्या २९ सेवा आता ‘ONLINE’, आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांचे परिपत्रक जारी

ई-सुविधांवर भर : कोणताही ऑफलाइन अर्ज स्विकारला जाणार नाही

पिंपरी-चिंचवड | ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार’ प्रशासनाने सांगितलेल्या २९ सेवा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील नागरिकांना ऑनलाइन उपलब्ध झाल्या आहेत. आता कोणताही ऑफलाइन अर्ज स्विकारला जाणार नाही. या संदर्भातील अधिकृत परिपत्रक आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी जारी केले आहे.

विकास परवानगी विभागातील इमारत बांधकाम परवानगी, जोता मोजणी प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, झोन दाखला, भाग नकाशा, सुधारित बांधकाम परवानगी आणि विविध तांत्रिक परवाने, जमीन व मालमत्ता विभागाशी संबंधित सदनिका किंवा भूखंडांचे हस्तांतरण, वारस नोंद, कर्जासाठी लागणारे ना-हरकत प्रमाणपत्र आणि भूखंडांची फेरमोजणी यांसह अग्निशमन विभागाचे ना-हरकत दाखले आणि पर्यावरण मंजुरी प्रमाणपत्र यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. या सेवा लोकसेवा हक्क कायद्याच्या चौकटीत येत असल्याने ठरावीक कालमयदित सेवा देणे प्रशासनासाठी बंधनकारक आहे.

ऑनलाईन सेवांमुळे नागरिकांचा वेळ व श्रम वाचेल. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन प्रशासन अधिक लोकाभिमुख होईल, असे पीएमआरडीए प्रशासनाने सांगितले आहे.

हेही वाचा    :      न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी 

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button