ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवना नदीवर गहुंजे आणि शिवणेला नियोजन दोन बंधारे उभारण्याचे नियोजन

महापालिका 24 कोटींचा निधी देणार

पिंपरी चिंचवड | पवना नदीवर गहुंजे आणि शिवणे येथे दोन बंधारे उभारल्याने आजूबाजूला असलेल्या गावांतील शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. बंधारे बांधण्यासाठी 24 कोटी रुपये इतका खर्च केला जाणार आहे. जलसंपदा विभागाकडून हे बंधारे उभारले जाणार आहेत. बंधारे उभारण्यासाठी आवश्यक निधी पिंपरा-चिंचवड महापालिका टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देणार आहे.

पवना नदीवर सध्या 4 बंधारे आहेत. गहुंजे आणि शिवणे येथे बंधारा उभारण्याची गरज आहे. येथे सध्या बंधारा नसल्याने त्या परिसरातील नदी उन्हाळ्यात कोरडी पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक पाणी उचलण्यात अडचणी येतात. त्यावर उपाययोजना म्हणून बंधारे उभारण्याचे नियोजन आहे. गहुंजे येथे बंधारा उभारल्यानंतर त्याचे पाणी भूगावपर्यंत देता येणार आहे.

बंधाऱ्याच्या आजूबाजूला असलेल्या गावांतील शेतकऱ्यांना शेतीसाठी बंधारे उभारल्यानंतर पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण यांच्या सूचनेनुसार हे बंधारे उभारले जात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button