breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवड

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांवर पिंपरीत शाईफेक, तीन जण पोलिसांच्या ताब्यात

पिंपरी-चिंचवड । महाईन्यूज। विशेष प्रतिनिधी ।

भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरीत शाईफेक करण्यात आली आहे. यावेळी शाईफेक करणाऱ्या हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. थोर महापुरुषांबद्दल चंद्रकांत पाटील यांनी काल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ आज कोथरूड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत पाटील ‘हाय हाय’च्या घोषणाही देण्यात आल्या होत्या.

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती, असं वादग्रस्त वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावरून आता वातावरण चांगलचं तापलं आहे. चंद्रकांत पाटील पिंपरी-चिंचवडमध्ये मोरया गोसावी महोत्सवासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आपल्या एका कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. कार्यकर्त्याच्या घरून निघाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षा व्यवस्थेत पोलीस बंदोबस्त असूनही काही कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकून हल्ला केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक हल्ला झाल्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button