breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

युवा संघर्ष यात्रेवरील पोलिसांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड महिला आक्रमक

महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन

पिंपरी : युवा संघर्ष यात्रेच्या नागपूर येथील समारोप समारंभात नागपूर पोलिसांकडून युवकांवर लाटी हल्ला करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार आणि रोहित पाटील यांना संघर्ष यात्रेच्या दरम्यान पोलिसांनी केलेल्या अटकेच्या निषेधार्थ आज पिंपरी चिंचवड महिला काँग्रेस तसेच पिंपरी चिंचवड विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पिंपरी चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर म्हणाल्या, युवा संघर्ष यात्रेद्वारे राज्यातून ८०० किलोमीटर पायी प्रवास करून आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेचे मूलभूत प्रश्न घेतले. या निमित्ताने बेरोजगार युवक, गोरगरीब शेतकरी, महाराष्ट्रातील महिलांचे प्रश्न यावर सरकार ने योग्य ती ठोस पावलं उचलावी यासाठी निवेदन सादर करण्यासाठी विधान भवनात जात असताना. नागपूर पोलिसांनी युवकांवर लाटी हल्ला चढवला तसेच बेकायदेशीरपणे आंदोलनकर्त्याना अटक केली या केलेल्या अटकेचा आम्ही निषेध व्यक्त करतो. महाराष्ट्रातील युवा येणाऱ्या निवडणुकीत या जुलमी सरकारला योग्य तो धडा शिकवेल. अशा शब्दात त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.

कष्टकऱ्यांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कष्टकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथजी नखाते यांनी कष्टकऱ्यांवर अन्याय होत आहे तुम्ही आमच्या नेत्यांवरती लाठी चार्ज व अटक करण्याचा प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी केलात इथून पुढच्या काळात असे घडले तर पूर्ण राज्यभर आम्हीं आंदोलन करणार असं नमूद केलं.

हेही वाचा  –  ‘मराठा आरक्षणाबाबत काय निर्णय घेतला ते १७ डिसेंबरपर्यंत सांगा, अन्यथा..’; मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम 

यावेळी बोलताना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल आहेर म्हणाले, सरकारने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ सरकारवर जोरदार हल्ला चढवला व पुन्हा रोहित दादांना या पद्धतीने अटक करण्याचा प्रयत्न कराल पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात जेलभरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला.

यावेळी युवक अध्यक्ष इम्रान भाई शेख, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, शहर उपाध्यक्ष अनिल भोसले, महिला पदाधिकारी कार्याध्यक्ष शारदा चोकशी, चिंचवड विधानसभा अध्यक्ष स्वप्नाली आसोले, भोसरी विधानसभा अध्यक्ष पूजा आल्हाट, भोसरी कार्याध्यक्ष सारिका हरगुडे, उपाध्यक्ष रेखा मोरे, कीर्ती तोरणे, दिपाली केदारी, अलका कांबळे, विश्रांती ताई पाडाळे, सुप्रिया जगताप, प्रगती सिनलकर, प्रियांका आल्हाट, लता मकासरे, नीता महानवर, जनाबाई जाधव, ओबीसी सेल अध्यक्ष विशाल जाधव, विद्यार्थी पदाधिकारी सरचिटणीस तुषार गाडे, सचिव ऋषभ भडाळे, उपाध्यक्ष ऋषिकेश सत्रे, मुख्य सरचिटणीस चैतन्य बनकर  पिंपरी अध्यक्ष ऋतिक गायकवाड,  महाविद्यालयाध्यक्ष अभिषेक कांबळे, सुरज देशमाने, भोसरी विधानसभा संकेत वाघमारे, विश्वजित लोंढे, मनोज माने व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button