breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड: “बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळा…’’ : आमदार महेश लांडगे

पाच बांगलादेशींना अटक : पिंपरी-चिंचवडच्या सुरक्षेबाबत विधानसभेत मुद्दा मांडणार!

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांवर पुन्हा एकदा कारवाई केली आहे. पाच घुसखोर बांगलादेशींना अटक केली असून, त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड, पासपोर्ट, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला मिळाला आहे. भोसरी येथील शांतीनगरमध्ये शनिवारी ही कारवाई करण्यात आली आहे.

शांतीनगरमध्ये काही बांगलादेशी घुसखोर ओळख लपवून वास्तव्य करत आहेत. पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या दहशत विरोधी शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही धडक करावाई केली. त्याबद्दल भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी याबाबत आक्रमक भूमिका देखील मांडली आहे.

दहशतवाद विरोधी शाखा आणि भोसरी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली असली, तरी शहरातील काही भागांमध्ये अनेक ठिकाणी बनावट आधारकार्ड, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला व पासपोर्टच्या आधारे भारतीय नागरिक असल्याचे भासवून घुसखोर वास्तव्य करीत आहेत. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने अशा घुसखोरांच्या वेळीच मुसक्या आवळाव्यात, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, राज्य सरकारचं आगामी विधिमंडळाचं अधिवेशन येत्या काही महिन्यात होणार आहे. या अधिवेशनात बांगलादेशी घुसखोर व पिंपरी-चिंचवडची सुरक्षा’’ या संवदेनशील मुद्यावर प्रभावीपणे भूमिका मांडणार असल्याचं मत देखील महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button