breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प गुंडाळा, स्मार्ट वैद्यकीय सेवा द्या

  • टक्केवारी गणितात कोरोना परस्थितीकडे सत्ताधारी भाजपचे दुर्लक्ष

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रसार वाढत आहे. बाधित रुग्णांची आकडेवारी पाहता महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा तोडकी ठरत आहे. सर्वसामान्य नागरिकांवर उपचारास कमी पडत आहे. बेड अपुरे पडू लागले असून रेमडेसिवीर इंजेक्शन, प्लाझा देखील मिळेना झाला आहे. त्यामुळे ‘स्मार्ट सिटी’ची कोट्यावधीची अनेक कामे सुरु आहेत. ही कामे राजकारणी पुढा-याच्या बगलबच्चे ठेकेदाराचे कुरणच आहे. ही सर्व कामे बंद करुन स्मार्ट सिटीचा सर्व निधी स्मार्ट वैदयकीय सेवेसाठी खर्च करावा,अशी मागणी मराठी एकीकरण विकास आघाडी व सजग भ्रष्टाचार निर्मुलन महासंघाच्या प्रदेश अध्यक्षा छाया सोळंके-जगदाळे यांनी केली.

याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार आणि महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना पत्र दिले. या पत्रात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील मंगल कार्यालय, पडून असलेले गृहप्रकल्पात कोवीड सेंटर म्हणून वापर करावा, त्यासाठी वैद्यकीय साहित्य-उपकरणे खरेदी करुन पुरेशे मनुष्यबळ उपलब्ध करीत बाधितावर उपचार करावा.अशी मागणी केलीय. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे काम कुणाचे आहे. ही कामे कोणकोणत्या राजकीय पुढाऱ्यांनी वाटून घेतली आहेत. या कामाची टक्केवारी कशा पध्दतीने वाटली जाते. हे सर्व शहरवासियांना आता ज्ञात झाले आहे. या स्मार्ट सिटीची कामे किती झाली. त्याचा दर्जा काय आहे?  सध्य स्थितीला त्याचा लोकहितासाठी काय उपयोग होत आहे. असे प्रश्न उपस्थित होत आहे.

महापालिकेने नागरिकांच्या आरोग्य, वैद्यकीय सुविधांना प्राधान्य देणे अपेक्षित आहे. पण महापालिका प्रशासन व सत्ताधारी हे नागरीकांना कदापी सांगणार नाहीत. हेही तितकेच खरे आहे. यावरुन यात गौडबंगाल काय आहे. हे न समजण्या इतके पिंपरी चिंचवडकर अज्ञानी नाहीत. तसेच इतरही विकासकामाच्या नावाखाली सर्व ठिकाणी सध्यस्थितीला कोट्यावधी रुपायाचे कामे सुरु असून, ती अतिमहत्वाची नाहीत. त्यामुळे या कामावर होणार खर्च कमी करुन तो निधी देखील कोरोना रुग्णावर खर्च करावा.

सध्या कोरोनाची दुसरी लाट राज्याबरोबरच पिंपरी चिंचवड शहरात देखील मोठ्या प्रमाणात पसरली आहे. यामध्ये हजारो रुग्ण बाधीत झाले आहेत. शहरातील सर्वच रुग्णालय कोरोनाच्या रुग्णांनी भरले असून यामध्ये महापालिका प्रशासनाची वैद्यकीय सेवा तोडकी पडत आहे. यामुळे कष्टकरी वर्गाला सेवा भेटत नाही. मरणाच्या भीतीमुळे अनेकांना खाजगी रुग्णालयाच्या पायऱ्या चढाव्या लागत आहेत. पण तो खर्च पेलण्याची कुवत नसल्यामुळे नाईलाजावास्तव अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत. मागील वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांची आर्थिक परस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे पैशा अभावी उपचार करु शकत नाहीत. अशांना महापालिकेच्या सेवेशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे महापालिकेने सर्वच विकास कामे बंद ठेवून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेला प्राधान्य देऊन त्यासाठी निधी खर्ची करावा व नागरीकांचे जीव वाचवावे. असेही म्हटले आहे.

सत्ताधारी भाजप कोरोनावर उपाययोजना करण्यास पुर्णपणे अपयशी

कोरोनाची दुसरी लाट आता सर्वसामान्यांच्या घरात घुसली आहे. अनेक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. वास्तवीक पाहता शहराची लोकसंख्या व रुग्णालय विचारात घेता महापालिकेने रुग्णालयांची व्यवस्था करणे गरजेचे होते. त्यातच कोरोना प्रतिबंधक औषध व साहित्य याचा देखील गांभिर्याने विचार करणे गरजेचा होता. पण शहराला स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी मात्र स्मार्ट वैदयकीय सेवेला डावलल्याचे दिसत आहे. रेमडीसरिव्हर इंन्जेक्शन नाहीत, ऑक्सिजन नाही , बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे शहरात रोजच दोन आकडी संख्येने नागरीक मरण पावत आहेत. याला फक्त वैद्यकीय उपचार वेळेत मिळत नाहीत. हेच प्रमुख कारण आहे. त्यामुळे महापालिकेने सर्वच विकास कामे ताबडतोब थांबवावीत. नागरीकांच्या आरोग्याला प्राधान्य देत वैद्यकीय सेवेत सुधारणा करुन त्यासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करुन देणे. सध्या खुप गरजेचे झाले आहे. त्याबरोबरच शहरातील मंगल कार्यालय व पडून असलेले गृहप्रकल्प यांच्या सबंधीत मालकांशी विनंती करुन ते देखील कोवीड सेंटर म्हणून वापराचा विचार करून रुग्णांना बेड उपलब्ध करुन देण्यात यावेत. अशीही मागणी छाया सोळंके-जगदाळे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button