पिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२६ : राष्ट्रवादी काँग्रेसची विजय संकल्प सभा उत्साहात

मिशन- PCMC : विकास, न्याय आणि सक्षम नेतृत्वासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेली विजय संकल्प सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेत मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांना मार्गदर्शन करत आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

यावेळी प्रभाग क्र. ५ मधील अधिकृत उमेदवार श्रीम. भिमाबाई पोपट फुगे, श्री. अमर परशुराम फुगे, श्री. प्रियंका प्रविण बारसे, ॲड. राहुल बाळासाहेब गवळी तसेच प्रभाग क्र. ७ मधील अधिकृत उमेदवार श्री. विराज विश्वनाथ लांडे, श्रीम. अनुराधा सुशिल लांडगे, श्रीम. अश्विनी निलेश फुगे, श्री. अमोल मधुकर डोळस यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती.

हेही वाचा –  भोसरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपाची दमदार प्रचार रॅली

मा. अजितदादा पवार यांनी आपल्या भाषणात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आणि अनुभवी नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे सांगितले. पिंपरी-चिंचवडमधील नागरी समस्या, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक, आरोग्य व शिक्षण या विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सातत्याने काम केल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “न्याय, हक्क आणि विकासाच्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेस सदैव नागरिकांच्या पाठीशी उभी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. उपस्थितांमध्ये आगामी निवडणुकीबाबत उत्साहाचे वातावरण दिसून आले. यावेळी नागरिकांना आवाहन करताना सांगण्यात आले की, १५ जानेवारी रोजी ‘घड्याळा’च्या चिन्हासमोरील बटण दाबून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा आणि नागरी समस्यांमधून कायमची सुटका मिळवा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button