पिंपरी / चिंचवड

भोसरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपाची दमदार प्रचार रॅली

मिशन- PCMC: आझाद नगर–चऱ्होली परिसरात सायंकाळी संवाद दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून प्रचाराला वेग आला असून, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत भोसरी येथे भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

या प्रचार रॅलीत दमदार आमदार श्री. महेशदादा लांडगे, पिंपरी-चिंचवड शहराचे मा. महापौर व प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार श्री. नितीनआप्पा काळजे, पिंपरी-चिंचवड शहर भाजपाचे कोषाध्यक्ष श्री. सचिनभाऊ तापकीर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे प्रभागातील सर्व भावी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात रॅलीने भोसरी परिसरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

हेही वाचा – चिखली घरकुलमधील ६,७०० कुटुंबांना दिलासा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विकास, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकाभिमुख धोरणांवर भर दिला. पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपाला पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, आज संध्याकाळच्या सत्रात आझाद नगर, दाभाडे वस्ती, चऱ्होली परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये प्रचाराच्या अनुषंगाने संवाद दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्यात नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. स्थानिक नागरिकांनीही या संवाद दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत भाजपाच्या विकासात्मक भूमिकेवर विश्वास व्यक्त केला. एकूणच, भोसरीतील प्रचार रॅली आणि आझाद नगर–चऱ्होलीतील संवाद दौऱ्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपाने आपली ताकद आणि संघटनशक्ती प्रभावीपणे दाखवून दिली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button