Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेचा ७०२ कोटींचा मालमत्ता कर वसूल

PCMC : थकबाकीदार मिळकतदारांना प्रशासनाचे आवाहन

पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत १ एप्रिल २०२५ पासून ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ७०२ कोटी ७३ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. तसेच पुढील दोन महिन्यांत मालमत्ता कर वसुलीच्या दृष्टीने व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. तरी ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांनी तो लवकरात लवकर भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

महापालिकेच्या कर संकलन विभागाने यावर्षी कर वसुलीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. ऑनलाईन पेमेंट प्रणाली तसेच विविध डिजिटल माध्यमांद्वारे नागरिकांना कर भरण्यासाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासोबतच, कर भरण्याबाबत एसएमएस, नोटीस व प्रत्यक्ष भेटीद्वारे नियमित पाठपुरावा करण्यात आल्याने वसुलीच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.

हेही वाचा – इंद्रायणी नदीवरील धोकादायक पूल बंद!

थेरगाव विभागीय कार्यालयांतर्गत सर्वात जास्त वसुली

कर आकारणी व कर संकलन विभागाची १ एप्रिल २०२५ पासून ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत थेरगाव विभागीय कार्यालयांतर्गत सर्वात जास्त वसुली झाली आहे. या कालावधीत या कार्यालयाने ६९ कोटी ३ लाख रुपयांची वसुली केली आहे. तर चिंचवड विभागीय कार्यालयाने ४५ कोटी ४९ लाख, चिखली कार्यालयाने ५४ कोटी २७ लाख, कस्पटे वस्ती कार्यालयाने ४९ कोटी ९८ लाख, मनपा भवन ३४ कोटी २१ लाख, भोसरी ४४ कोटी ९१ लाख, सांगवी ३५ कोटी २६ लाख, मोशी ४३ कोटी ५२ लाख, पिंपरी वाघेरे ४२ कोटी २ लाख, किवळे ४७ कोटी ८७ लाख, वाकड ८७ कोटी ४४ लाख, चऱ्होली २७ कोटी २१ लाख, निगडी प्राधिकरण १५ कोटी ६५ लाख, पिंपरी नगर ५ कोटी ७८ लाख, आकुर्डी ३२ कोटी ९४ लाख, दिघी-बोपखेल २१ कोटी ४० लाख, तळवडे १७ कोटी ६३ लाख, फुगेवाडी-दापोडी विभागीय कार्यालयाने २८ कोटी १० लाख रुपयांची वसुली केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने केलेले नियोजनबद्ध काम, नागरिकांचा वाढता सहभाग आणि वेळेत कर भरण्यासाठी देण्यात आलेल्या सवलती यामुळे चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. ही वसुली केवळ आर्थिक आकडा नसून, शहराच्या विकासासाठी नागरिकांनी दाखवलेल्या जबाबदारीची साक्ष आहे. उर्वरित मालमत्ताधारकांनीही वेळेत कर भरून शहराच्या विकासात आपले योगदान द्यावे.

— तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

मालमत्ता कर संकलनासाठी विभागामार्फत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कर भरण्याबाबत जनजागृती मोहीम, थकबाकीदारांविरोधात प्रभावी कारवाई राबविण्यात येत आहे. या सर्व उपाययोजनांमुळे चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत कर वसुलीचा आकडा ७०० कोटीच्या पुढे गेला आहे. ज्या नागरिकांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांनी पुढील कार्यवाही टाळण्यासाठी तातडीने मालमत्ता कर भरावा.

— सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button