breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोकण पूरग्रस्तांसाठी पिंपरी-चिंचवड सरसावले; मधुकर बच्चे यांचा पुढाकार!

  • भाजपा भटके विमुक्त युवा आघाडीचा आदर्श उपक्रम

पिंपरी | प्रतिनिधी
कोकणमध्ये आलेल्या पुरामध्ये तेथील जनजीवन विस्कळीत झाले असून पूरग्रस्तांना मदतीची गरज निर्माण झाली आहे. राज्यभरातून कोकणला मदतीचा ओघ सुरु असतानाच पिंपरी-चिंचवडही मदतीसाठी सरसावले आहे. मधुकर बच्चे युवा मंच व भाजपा भटके विमुक्त युवा आघाडी पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने कोकण येथील पोलादपूर तालुक्यातील कणगुळे गावात मदत पोहचवण्यात आली. विशेष म्हणजे आर्थिक मदत, किराणा व कपड्यांसोबतच भांडी, मिक्सर व तत्सम गृहपोयोगी वस्तूही देण्यात आल्या.

कोकणमधील कणगुळे गावातील सवाद ग्रामपंचायत या ठिकाणी ८० घरे व जवळपास ४०० लोकसंख्या असणाऱ्या गावात थेट मदत पोहचवण्यात आली. भाजयुमो रायगड जिल्ह्या उपाध्यक्ष श्रीकांत भिलारे, नाईक मराठा सेवा संघ अध्यक्ष उमेश कालेकर, उपसरपंच आशा खेडेकर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही मदत सुपूर्त करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी मधुकर बच्चे युवा मंच पदाधिकारी व दानशूर जनतेचे आभार मानले.

बच्चे म्हणाले, कोणत्याही जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती आल्यास मदतीस धावून जाणे हे आपले सामाजिक आणि नैतिक कर्तव्य आहे. कोकणमध्ये आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रत्येकाने सामाजिक बांधिक्ली जोपासत त्यांना मदत करणे आवश्यक आहे. मदतीचे आवाहन केले असता अनेक दानशूर व्यक्तींनी मदतीचा निस्वार्थी हात पुढे केला असून त्यांचे आभार मानतो. मदतीत किराणा , कपडे इतर वस्तू याबरोबरच भांडी, मिक्सर, लाटणे, रवी, अशा अनेक गृहपयोगी वस्तूही देण्यात आल्या. या गावासाठी आणखी आणखी मदत आवश्यक असून दानशूरांनी पुढे येऊन मदत करावी असे आवाहन बच्चे यांनी केले. या उपक्रमासाठी भटके विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष सौरभ शिंदे, गणेश बच्चे, अभिजीत पवार, पोपट बच्चे, मनोज भिवरे, राहुल तांबोळी, राजू कोरे,सागर जोशी, भूषण भोंडे, समीर काळे, आदित्य नंदनवर, भार्गव कुलकर्णी, मयुरेश साळी, कारखानीस काका, पूजा कुककर्णी, पंकज घुले, नीता आचार्य आदींनी विशेष मदत केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button