breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Pimpri: चिखलीमध्ये बेकायदेशीररीत्या सिलिंडर रिफील करणाऱ्या दोघांवर गुन्हा

चिखली: कोणताही परवाना न घेता तसेच धोकादायकपणे मोठ्या सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस भरल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही घटना गुरुवारी (दि.3) सायंकाळी साडेसहा वाजता नेवाळे वस्ती, केशवनगर, चिखली येथे चौधरी सुपर मार्केटमध्ये घडलेली आहे. ललित दुर्गाराम चौधरी (वय 40, रा. केशवनगर, नेवाळे वस्ती, चिखली), अजय जैन (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक राजेंद्र भीमराव केदार यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दोघेजण भागीदारी करून अवैधरित्या घरगुती मोठ्या सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने गॅस भरत होते. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत तीन मोठे भारत गॅस कंपनीचे रिकामे सिलिंडर, एक अर्धा भरलेला सिलिंडर आणि 18 लहान सिलिंडर असे एकूण 22 सिलिंडर आणि अन्य साहित्य असा 18 हजार रुपयांचा माल जप्त केलेला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button