‘जनतेचा विश्वास-विकासाचा प्रवास’ : माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे
पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टतर्फे मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार

पिंपरी-चिंचवड | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम महापौर, हवेली तालुक्याचे माजी आमदार, तसेच पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि पवना सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून जबाबदाऱ्या सांभाळणारे माननीय ज्ञानेश्वर लांडगे यांचा वाढदिवस काल उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्त पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टतर्फे त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व विकासकामातील योगदानाबद्दल भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात लांडगे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हेही वाचा : प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये ८६ जणांचे उत्स्फूर्त रक्तदान
आभार व्यक्त करताना आमदार लांडगे म्हणाले, “जनतेचा आशिर्वाद आणि विश्वास हीच माझी ताकद आहे. विकासाची गती अधिक वेगाने वाढवण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील.”
या प्रसंगी पद्माताई भोसले, विठ्ठल शेठ काळभोर शांताराम गराडे, पद्माताई भोसले, नरेंद्र लांडगे अजिंक्य काळभोर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी लांडगे यांच्या कार्यशैलीचे आणि जनसेवेसाठीच्या बांधिलकीचे कौतुक केले.
जनतेचा विश्वास हीच माझी खरी शक्ती आहे. विकासाच्या प्रत्येक पावलामागे तुमचा पाठिंबा आहे, आणि तोच मला सतत नवी ऊर्जा देतो.
– ज्ञनेश्वर लांडगे, माजी आमदार.




