Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC: ऑटो क्लस्टर ते आयुक्त निवास मिसिंग लिंकचे काम प्रगतीपथावर!

पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीच्या सुरळीततेसाठी आवश्यक सुधारणांचा समावेश

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता, महापालिकेच्या स्थापत्य (प्रकल्प) विभागामार्फत काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्त्यावरील ऑटो क्लस्टर ते आयुक्त निवासस्थान दरम्यानच्या इंडोलिंक युरोसिटी औद्योगिक परिसरातील मिसिंग लिंक रस्ता विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सध्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कडून आणखी काही जागांचा ताबा मिळाल्यानंतर काम पुर्णत्वाकडे येणार आहे. यामुळे काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्त्यावरील वाहने कोणताही वळसा न घेता थेट जाण्याची सोय होणार आहे. पुणे महानगर परिवहनाच्या बसेसच्या मार्गात सुसुत्रता येणार आहे. महानगरपालिकेच्या प्राधान्यक्रमातील या कामामध्ये संबंधित मिसिंग लिंक रस्त्यांचे विस्तारीकरण, दुरुस्ती, जलवाहिनी व प्रकाशयोजना व्यवस्था तसेच वाहतुकीच्या सुरळीततेसाठी आवश्यक सुधारणा यांचा समावेश आहे.

प्रकल्पासाठी तांत्रिक व व्यवस्थापन सल्लागार म्हणून “मॅप्स ग्लोबल सिव्हीलटेक प्रा. लि.” या पुणे आधारित संस्थेची फक्त निविदा पश्चात काम करणेसाठी निवड करण्यात आली. यासाठी जानेवारी-फेब्रुवारी २०२५ दरम्यान प्रसिद्ध झालेल्या ई-कोटेशनद्वारे प्राप्त निविदाधारकापैकी “मॅप्स ग्लोबल सिव्हीलटेक प्रा. लि.” यांचे दर सर्वात कमीचे प्राप्त झाले होते. त्यानुषंगाने त्यांना लेटर ऑफ इंटेंट देणेत आले होते व त्यानुसार फेब्रुवारी महिन्यापासून कंपनीने काम सुरू केले. या प्रकल्पामध्ये कोणतीही तडजोड न करता गुणवत्ता आणि वेळेचे नियोजन हे महत्त्वाचे निकष ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे कामास विलंब होऊ नये यासाठी कंपनीस त्वरित काम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. दरम्यानचे कालावधीमध्ये प्रशासकीय बाबींची पुर्तता करण्याची कार्यवाही चालू होती.

हेही वाचा –  लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी? निकष बदलणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितले…

या कंपनीकडे कामाचे संपूर्ण नियोजन, देखरेख, गुणवत्ता तपासणी आणि तांत्रिक मार्गदर्शन याची जबाबदारी आहे. याशिवाय, रस्त्यांचे आराखडे, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा उपाययोजना, पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि पर्यावरणाचा समतोल राखून कामाची अंमलबजावणी करण्याबाबत देखील कंपनीला सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या कामाच्या प्रत्येक टप्प्यावर तपासणी करून अहवाल तयार केला जाणार असून काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होईल याची दक्षता घेतली जात आहे. सद्यस्थितीमध्ये ३०मी. रुंदीचा रस्ता विकसित करण्यात आलेला असून तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक सुरू केलेली आहे. एमआयडीसी कडून उर्वरीत जागा ताब्यात आल्यानंतर पूर्ण क्षमतेने रस्ता विकसित करण्यात येणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

शहराचा शाश्वत आणि नियोजनबद्ध विकास हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे उद्दिष्ट आहे. काळेवाडी फाटा ते देहू आळंदी या रस्त्यावरील इंडोलिंक युरोसिटी परिसरातील रस्त्याचे विकसनाचे काम हे त्याच दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि सुकर वाहतूक सुविधा देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. कामाची गुणवत्ता आणि वेळेचे नियोजन याबाबत कोणतीही तडजोड न करता प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे शहरातील वाहतूक अधिक सुसंगत होईल आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडून येतील असा विश्वास आहे.

– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

ऑटो क्लस्टर ते आयुक्त निवास रस्ता जवळील इंडोलिंक युरोसिटी औद्योगिक परिसरातील मिसिंग लिंक रस्त्याचे काम हे शहराच्या वाहतूकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. या प्रकल्पात रस्त्यांचे विस्तारीकरण, पाणीपुरवठा व्यवस्था, प्रकाशयोजना आणि वाहतूक सुरळीत करणाऱ्या विविध सुधारणा समाविष्ट आहेत. निविदा पश्चात कामासाठी सल्लागार संस्थेच्या मदतीने कामाचे काटेकोर नियोजन आखण्यात आले असून काम प्रगतीपथावर आहे. तसेच जागा हस्तांतरण प्रक्रिया जलद गतीने पुर्ण करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत आयुक्त पातळीवर मार्च अखेर झाली आहे. उर्वरीत जागा रिकामी करण्यासाठी एमआयडीसी मार्फत मागील आठवड्यात कळविले आहे.कामाची मुदत जानेवारी २०२६ पर्यंत आहे. उर्वरीत रस्त्याचे काम मुदतीपूर्वी पूर्ण करून वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने खुला करणेचे नियोजन आहे.

प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, स्थापत्य (प्रकल्प) विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button