Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी? निकष बदलणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितले…

Aditi Tatkare :  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याचे पैसे अद्यापही सरकारकडून देण्यात आलेले नाही. त्यामुळे एप्रिलचा सातवा हप्ता कधी जमा होणार याची महिलांना प्रतिक्षा आहे. यासंदर्भात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली.

माध्यमांशी संवाद साधताना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, “एप्रिल महिना संपण्याच्या आधी पात्र महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ वितरीत केला जाणार आहे.” यावेळी आदिती तटकरे यांनी यासंदर्भात कोणतीही थेट तारीख दिली नाही. तर काही वृत्तांनुसार, ३० एप्रिलला अक्षय तृतीयेला हा निधी वितरीत केला जाणार आहे.

हेही वाचा –  “पीकविमा योजनेत आम्हाला अनेकांनी चुना लावला”, अजित पवारांचं विधान चर्चेत

या योजनेतील पात्र महिलांच्या अर्जांच्या छाननी प्रक्रियेविषयी विचारण्यात आलं. तेव्हा आदिती तटकरे म्हणाल्या, “सुरुवातीपासून या योजनेसंदर्भात फार गैरसमज पसरवले गेले आहेत. अडीच लाखांचे उत्पन्न असलेल्यांनाच हा लाभ मिळणार आहे. त्यात नवीन काही नाही. लाडकी बहीण योजनेचा शासननिर्णयात हेच नमूद आहे. याशिवाय ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत, संजय गांधी निराधार योजनेतून घेत असतील, तर त्यांना त्या योजनेचे १५०० रुपये मिळत आहेत. त्यामुळे त्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत.

ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना १००० रुपये मिळत नमो शेतकरी योजनेतील मिळतील आणि तर ५०० रुपये लाडकी बहीण योजनेमधून मिळतील. हेच मूळ शासननिर्णयातही म्हटले आहे,” असेही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button