Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणे

PCMC: कायदेशीर प्रक्रिया झाल्याशिवाय ‘पीसीएमसी’ कुदळवाडीमधील मंदिर आणि मस्जिदींना हात लावणार नाही!

‘डिमॉलिशन’ ला एकप्रकारे स्थगिती : शहर अभियंता मकरंद निकम यांची ॲड. असीम सरोदे यांना ग्वाही

पिंपरी-चिंचवड: चिखली-कुदळवाडी येथील धार्मिक स्थळांना ‘अतिक्रमण’ असे लेबल लावून दिलेल्या नोटिसेस एकतर्फी, कायद्याची प्रक्रिया न करता व सर्वोच्च न्यायालयाने सांगिलेली प्रक्रिया पूर्ण करावी, असे मत ॲड. असीम सरोदे यांनी मांडले. यावर कायदेशीर प्रक्रिया झाल्याशिवाय ‘पीसीएमसी’ कुदळवाडीमधील मंदिर आणि मस्जिदींना हात लावणार नाही, अशी ग्वाही मुख्य अभियंता मकरंद निकम यांनी दिली.

पीसीएमसीचे शहर अभियंता मकरंद निकम यांची ॲड.असीम सरोदे यांनी त्यांच्या सहकारी वकिलांसह पीसीएमसी कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली. यावेळी ॲड. श्रीया आवले, ॲड. गौतम कुडूक, ॲड. अरहंत धोत्रे, ॲड. प्रशाली काळे, ॲड. राधनी हंबरडे, अस्मा क्षीरसागर उपस्थित होते.

महानगरपालिका कायद्याच्या कलम 487 नुसार पीसीएमसी ला नोटीस देणे आवश्यक असल्याने ती प्रक्रिया शहर अभियंता मकरंद निकम यांना नोटीस इमेल द्वारे आणि प्रत्यक्ष देऊन पूर्ण करण्यात आल्याची माहिती ॲड. श्रीया आवले यांनी दिली. ‘ आम्ही सुनावणी घेतल्याशिवाय, सगळ्यांचे मत ऐकून घेतल्याशिवाय मस्जिदींच्या विरोधात डिमॉलिशन कारवाई करणार नाही, असे पीसीएमसीचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी ॲड. असीम सरोदे यांना सांगितले.

यापार्श्वभूमीवर मस्जिदी पाडण्यावर साधारणतः 25 ते 30 दिवसांचा ‘स्टे’ मिळाला आहे असे स्पष्ट झाल्याचे ॲड. असीम सरोदे म्हणाले. आता सगळ्या मंदिर-मस्जिद अश्या धार्मिक स्थळांची पाहणी करणे, त्याबाबत अहवाल तयार करणे, सगळ्यांना सुनावणीसाठी वेळ देणे, त्यानंतर पुढील 15 दिवस न्यायालयात जाण्यासाठी वेळ देणे अशी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असी माहिती ॲड. कुडूक गौतम यांनी दिली.

हेही वाचा: PCMC | नवीन पाणी पुरवठा कनेक्शनसाठी पुढील दोन महिने स्थगिती

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button