breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवीन विसर्जन हौद अन्‌ दुरूस्ती करा! 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेखर काटे यांची मागणी : महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर परिसरात नवीन गणेश मूर्ती विसर्जन हौद बनवणे व डागडुजी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेखर काटे यांनी केली आहे. 

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, शहरात मोठ्या प्रमानात आनंदाने गणेशोस्तव साजरा केला जातो परंतु सध्या नद्यांचे झालेले प्रदुषण व नदी घाटावर विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता शहरात सध्या अस्तित्वात असलेले विसर्जन तलाव हे कमी आहेत तरी गर्दी टाळण्यासाठी व भाविकाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी नविन विसर्जन तलावांच्या निर्मितीची गरज निर्माण झाली. आहे तरी महानगरपालिका प्रशासनाद्वारे लवकरात लवकर शहरांत जास्तीत जास्त ठिकाणी विसर्जन हौद सुख सुविधा पूर्वक बनवून घेण्यात यावे, अशी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने  आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

सदर निवेदन देताना युवक अध्यक्ष शेखर काटे, शहर कार्याध्यक्ष प्रसाद कोलते, प्रसन्ना डांगे, तुषार ताम्हाणे, लवकुश यादव, इत्यादीसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button