ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC: महापौर निवडीत महेशदादांचा सिंहाचा वाटा: महापौर रवि लांडगे

वस्ताद किसनराव लांडगे यांची भेट: जुन्या आठवणींना मिळाला उजाळा

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापौरपदी नवनिर्वाचित रवि लांडगे यांची निवड होताच भोसरीतील आदरणीय कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने त्यांना खास सदिच्छा भेट दिली. भारतीय जनता पार्टीचे नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या घरी झालेल्या या भेटीत त्यांचे वडील वस्ताद किसनराव लांडगे यांनी स्वतः फेटा बांधून महापौर रवि लांडगे यांचा सन्मान केला.

सदिच्छा भेटीदरम्यान लांडगे कुटुंबाच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. कै. बाबासाहेब लांडगे, वस्ताद किसनराव लांडगे आणि कै. शंकरराव लांडगे यांनी भोसरी गावठाणमधील बापू जी बुवा चौकात आझाद गणेश मित्र मंडळ एकत्र येऊन स्थापन केले होते. त्या काळातील जिद्दी आणि मैत्रीची आठवण सांगताना बाबांनी भावनिक क्षण अनुभवला.

यावेळी त्यांनी रवि लांडगे यांना टीका-टिप्पणीकडे दुर्लक्ष करून काम करत राहण्याचा सल्ला दिला. रवि लांडगे यांनीही व्यक्त केले की, महापौरपदी निवड मिळाल्यामुळे संपूर्ण लांडगे परिवार एकत्र आला असून, शहराच्या विकासात सर्वांनी एकत्रितपणे मोलाचे योगदान द्यायचे आहे.

“पिंपरी-चिंचवडच्या प्रत्येक नागरिकासाठी विकास, सुव्यवस्था आणि संधी या तीन गोष्टी माझ्या नेतृत्वाखाली प्राधान्य असतील. आपण एकत्र येऊन शहराला अधिक सशक्त, स्वच्छ आणि सर्वांगीसाठी समृद्ध बनवू.”
रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button