breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभा, बैठका आता ‘वेबिनार’द्वारे होणार?

– महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील संघर्ष टाळण्याचा प्रयत्न

– लॉकडाउनच्या काळात थेट खरेदी न करता स्थायी, महासभेच्या मान्यतेचा विचार

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये खरेदी प्रकरणांवरुन होणारे वाद-विवाद टाळण्यासाठी लॉकडाउन आणि त्यानंतरच्या काळात ‘सोशल डिस्टंसिंग’चे पालन करण्याच्या दृष्टीने आता महापालिका स्थायी समिती किंवा बैठका ‘वेबिनार’द्वारे घेण्यात येईल. त्यासाठी ‘गुगल मीट’सारख्या ॲपचा आधार घेतला जावू शकतो. त्याबाबत प्रशासकीय पातळीवर विचार सुरू आहे, अशी चर्चा महापालिका अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू आहे. येत्या ३ मे २०२० रोजी लॉकडाउन संपणार की पुढे वाढवणार याबाबत मतभिन्नता आहे. असे असले तरी महापालिका कामकाज सुरळीत झाले तरीही ‘सोशल डिस्टंसिंग’ची काळजी घ्यावीच लागणार आहे.

          दुसरीकडे, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी चालविलेल्या प्रत्येक खरेदीत आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना वाढीव दराने काम देण्यासाठी काही माजी पदाधिकारी वरिष्ठ नेत्यांचा दबाव आणण्याचा प्रकार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सुरु आहे. जादा दराने ठराविक ठेकेदारांकडून खरेदी करण्यास एका अधिकाऱ्याने विरोध केला असता त्याला दमबाजी करण्यात आली. वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रकाराचा धसका घेतल्याने त्या अधिकाऱ्याला व्हील चेअरच्या सहाय्याने थेट रुग्णालयात दाखल करावे लागले. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यामुळे प्रशासनाकडून ३ मे नंतर महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, लॉकडाउनमुळे महापालिकेतील केवळ १०% कर्मचारी कामावर आहेत. तसेच महानगरपाकेची मार्च व एप्रिल महिन्याच्या सर्वसाधारणसभा तहकूब केल्या असून, स्थायी समितीच्या बैठकीसुद्धा रद्द केल्या आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी विविध वस्तूंची खरेदी मनपा प्रशासनामार्फत युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. थेट पद्धतीने खरेदी होत असल्यामुळे पदाधिकारी प्रशासनाच्या कामकाजात हस्तक्षेप करीत आहेत. औषधे, वैद्यकीय उपकरणे, मास्क, सॅनिटायजर, धान्य, व गरजवंतांना जेवण अशा सर्वच कामात सुरु असलेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे अधिकारी हवालदिल झाले आहेत. यावर प्रभावी उपाय म्हणून महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर आणि वरिष्ठ अधिकारी यापुढे अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात होणारे वाद टाळण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून स्थायी समिती सदस्यांची बैठक घेण्याबाबत सकारात्मक आहेत. तसेच, सोशल डिस्टंसिंगसाठी महत्त्वाच्या बैठका या ‘बेबिनार’द्वारे होतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे खरेदी प्रकरणात पारदर्शकता राहील आणि निविदा प्रक्रियाही राबवता येईल, असा मतप्रवाह आहे. मात्र, याबाबत महापालिका प्रशासनाकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button