breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन-स्थायी समितीचा ‘सुट्टीस खेळ चाले’? सभापती म्हणतात, ‘हा’ आक्षेप चुकीचा!

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि स्थायी समिती सदस्यांच्या संगनमताने सध्या ‘सुट्टीत खेळ चाले’च्या ‘अर्थ’नाट्याचा प्रयोग सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शनिवारी सुट्टी असल्यामुळे महापालिकेचे प्रशासकीय काम बंद असते, पण स्थायी समितीचे काही सदस्य आणि प्रशासकीय अधिकारी अनौपचारिक बैठकीत व्यस्त आहेत, असा आक्षेप घेतला जात आहे. मात्र, स्थायी समितीचे मावळते सभापती विलास मडिगेरी यांनी हा आक्षेप फेटाळून लावला आहे.

वास्तविक, महापालिका नागरवस्ती विभागाच्या वतीने पवना थडी जत्रेच्या स्टॉल वाटपाची ‘लकी ड्रॉ’ काढण्याचे काम शनिवारी स्थायी समिती सभागृहात सुरू आहे. याठिकाणी महापौर उषा उर्फ माई ढोरे, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती उपस्थित आहेत, असा दुजोरा विलास मडिगेरी यांनी ‘महाईन्यूज’ शी बोलताना दिला.

दरम्यान, आयुक्त श्रावण हर्डिकर यांची स्वाक्षरी होवून प्रस्ताव तयार करण्यापूर्वीच महापालिकेतील विकासकामे ‘फायनल’ करण्याचा पायंडा पाडला जात आहे. अशाप्रकारे आठ ते दहा ठराव करुन घेतले आहे. प्रशासकीय कार्यवाही पूर्ण होण्यापूर्वीच सदस्य प्रस्ताव तयार केले आहेत. त्याला आयुक्तांची मान्यता घेतली नाही. स्वाक्षरी झाली नाही. प्रस्ताव सादर झाला नाही, असे असतानाही काही कामे मंजूर केली आहेत. वास्तविक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सत्ताकाळातही अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन झालेले नाही. मात्र, भाजपाच्या कार्यकाळात अशाप्रकारे पडद्याआड कामकाज सुरू करण्यात आल्यामुळे सत्ताधारी नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. परंतु, हा आक्षेप आणि चर्चा स्थायीचे सभापती विलास मडिगेरी यांनी फेटाळून लावली आहे.

आयुक्त हर्डिकर काय कारवाई करणार?

प्रशासकीय मान्यता, आयुक्तांनी प्रस्ताव सादर न करताच ठराव मंजूर करण्याचा प्रकार झाला आहे. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डिकर याबाबत काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

माझे दप्तर ‘चेक’ करीत आहे, त्याला आक्षेप नसावा : विलास मडिगेरी महापालिका प्रशासनाचे कामकाम आज बंद आहे. स्थायी समितीच्या माध्यमातून मी कोणतेही ‘इनव्‍हर्ट’ किंवा ‘आउटव्‍हर्ट’ करणार नाही. मी ३६५ दिवस काम केले आहे. माझा कार्यकाळ आता संपत आहे. माझे दप्तर चेक करणे आणि काही चूक झाले आहे अथवा नाही हे पाहण्यासाठी महापालिकेत जाणार होतो. यात गैर काहीच नाही. प्रशासकीय कामकाज बंद असले तरी मला दप्तर तपासण्यासाठी आक्षेप घेण्याची आवश्यकता नाही. नागर वस्ती विभागाचे प्रशासकीय काम स्टँडिंग हॉलला सुरू आहे. १२०० ड्रॉ काढायचे आहेत. सुमारे ३०० महिला महापालिकेत आल्या आहेत. मग, प्रशाकीय काम बंद कसे म्हणता येईल. ४ तारखेपासून पवना थडी जत्रा सुरू आहे. सुट्टीत काम करायचे नाही, असे कसे म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया स्थायी समितीचे मावळते सभापती विलास मडिगेरी यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button