breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
PCMC : पवना थडी जत्रेचे स्टॉल वाटप; ४ तारखेपासून होणार जत्रा!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/3-22.jpg)
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने भरविण्यात येणाऱ्या पवना थडी जत्रेचे स्टॉल वाटप ‘लकी ड्रॉ’ पद्धतीने शनिवारी महापालिका भवनात करण्यात आले. तब्बल १२०० अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ३०० महिला बचत गटांना स्टॉलवाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.
महापालिका स्थायी समिती सभागृहात शनिवारी ‘ड्रॉ’ काढण्यात आले. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, महिला बाल कल्याण समिती सभापती निर्मला कुटे, जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, नगरसेविका सुजाता पालांडे, अश्विनी चिंचवडे, नगरसचिव उल्हास जगताप आदी उपस्थित होते.