आतिश बारणे यांच्या कार्यालयास पार्थ पवार यांची सदिच्छा भेट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/mahaenews-2-1-780x470.jpg)
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष आतिष बारणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला युवा नेते पार्थ पवार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी आतिष बारणे यांनी पार्थ पवार यांना भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सन्मानित केले.
यावेळी राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भेटीदरम्यान, पार्थ पवार यांनी मोशी, बोराडेवाडी येथील बारणे पाटील चौक परिसरातील गट क्रमांक 230/ 1347 येथील 64 गुंठ्यांवर महानगरपालिकेचे आरक्षण आहे. येथे होणाऱ्या उद्यान व क्रीडांगण कामाच्या अनुषंगाने पार्थ पवार यांनी पाहणी केली.
हेही वाचा – देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून अपयशी, त्यांना लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांचा हल्लाबोल!
या परिसरातील जवळपास 27 सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशी यांची अनेक दिवसांपासून मागणी आहे की, या आरक्षित जागेवर उद्यान व क्रीडांगण व्हावे, या कामाची पाहणी पार्थ पवार यांनी केली. तसेच येथील रहिवासी नागरिकांची संवाद साधला या परिसरातील रहिवासी ज्येष्ठ नागरिक महिला आणि विविध सोसायटीतील रहिवासी यांनीही पार्थ पवार यांच्याशी संवाद साधून आपापले प्रश्न मांडले. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू, असा विश्वास पार्थ पवार यांनी दर्शविला.