breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘बदल हा श्रुष्टीचा नियम असून तो स्विकारला तरच प्रगती’; परशुराम पाटील

भुमकर वस्ती वाकड, शाळा : २५ वर्षांनी पुन्हा भरला सातवीचा वर्ग

वाकड | बदल हा श्रुष्टीचा नियम आहे. बदलाचा स्वीकार करून प्रगती साधने अनिवार्य असून शिक्षक व विद्यार्थ्यांतील काळानुरूप झालेला आधुनिक बदल अन प्रगती त्याचेच द्योतक आहे असे प्रतिपादन महापालिकेचे माजी आदर्श शिक्षक परशुराम पाटील यांनी भुमकर वस्ती, वाकड येथे केले.

भुमकर वस्ती जिल्हा परिषदेच्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा तब्बल २५ वर्षांनी झालेल्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. यावेळी तत्कालीन मुख्याध्यापक किसन गोडांबे, जेष्ठ शिक्षिका अलका गवळी, सुनिता गावडे, अलका बोऱ्हाडे, बाळासाहेब ढगे, मीना आमले, पद्माराणी इंगवले, शबाना शेख, चित्रा शेवकरी, जाईबाई भुमकर, प्रविण गायकवाड, आण्णा जाधव आदी शिक्षक उपस्थित होते. पुढे पाटील यांनी आधी होते मी दिवटी” ह्या कवितेतून आधुनिक बदलांचा उत्तम दाखला दिला. फुलांचा वर्षाव व सनई, तुतारी व ढोल-ताशाच्या गजरात गुरुजणांचे स्वागत झाले.

हेही वाचा    –    १८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू; २८० खासदार घेणार शपथ

मान्यवरांनी दिपप्रज्वलन व प्रतिमा पुजन केले. राष्ट्रगीत, प्रतिज्ञा व प्रार्थना असा परिपाठ झाला. परशु पाटील यांनी हजेरी घेतली. मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन शिक्षकांचा विद्यार्थ्यांनी सन्मान केला. शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारी व्हिडीओ क्लीप दाखविताच अनेकांना गहिवरून आले. विद्यार्थ्यांनी परिचय करून देत स्वतःची कारकिर्द सांगितली. सारिका कानडे-भूमकरने गेट-टुगेदर आज ही कविता सादर करून सर्वांना भावुक केले. सोनम भुमकरने तत्कालीन शिक्षणाचे सध्या मुलांसाठी होणारे फायदे सांगितले.

रत्नमाला वाकडकर, अतुल केदारी, सुधीर राऊत, देवाप्पा चलवादी यांनी मनोगतातून शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनीही मनोगतातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत विद्यार्थ्यांचे आभार मानले. हभप. अतुल वाकडकर, ओंकार कलाटे, रणजित गडदे, सुधीर राऊत, महादेव कांबळे, अमोल विनोदे, स्वाती वाकडकर, शोभा विनोदे, शिला भुमकर यांनी संयोजन केले. उद्योजक विक्रम विनोदे यांनी सूत्रसंचालन केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button