पिंपरी-चिंचवडमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान
भाजपा वरिष्ठ उपाध्यक्ष संजय पटनी यांची माहिती

संकल्पबद्ध प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना वैचारिक बळकटी
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या आगामी पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान २०२६ च्या यशस्वी आयोजनासाठी आज महत्त्वपूर्ण पूर्वतयारी बैठक संपन्न झाली. या बैठकीत पक्षाच्या उच्चस्तरीय पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहून आगामी प्रशिक्षणासाठी सखोल नियोजन व चर्चा केली.
भारतीय जनता पार्टी म्हणजे संस्कार, विचार आणि राष्ट्रसेवेची संघटना असून, स्व. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानवदर्शन या वैचारिक सिध्दांतांवर आधारित हे प्रशिक्षण महाभियान, कार्यकर्त्यांच्या वैचारिक विकासासोबत संघटनात्मक बळकटीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : देशविरोधी बोलणाऱ्यांना २० नाही तर २०० वेळा रोखू; श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना इशारा
या बैठकीत प्रशिक्षण महाभियानाचे नियोजन, कार्यपद्धती, कार्यकर्त्यांची तयारी, तसेच आगामी उपक्रमांची रूपरेषा यावर सखोल चर्चा करण्यात आली. २०२६ च्या दृष्टीने संघटन अधिक सक्षम, शिस्तबद्ध व विचारनिष्ठ करण्यासाठी हे महाभियान ठोस दिशादर्शक ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी सरचिटणीस विकास डोळस, सरचिटणीस वैशाली खाड्ये, मंडलाध्यक्ष शिवराज लांडगे, अजित बुर्डे, रामदास कुटे, अजय साने, प्रमोद परदेशी आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपा वरिष्ठ उपाध्यक्ष संजय पटनी यांनी या प्रशिक्षण महाभियानाची महत्त्वपूर्ण माहिती कार्यकर्त्यांना दिली. त्यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे, संघटन अधिक मजबूत करणे आणि राष्ट्रसेवेच्या ध्येयाने प्रेरित कार्यकर्ते घडवणे हा या प्रशिक्षण महाभियानाचा मुख्य उद्देश आहे. पक्षाच्या वैचारिक आणि संघटनात्मक बळकटीसाठी हे महाभियान ठळक पाऊल ठरणार असून, २०२६ मध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक, सशक्त आणि विचारसंपन्न करण्यास मोठा हातभार लागणार आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान हे केवळ कार्यकर्त्यांचे कौशल्य विकसित करण्याचे साधन नाही, तर हे पक्षाच्या विचारसरणीचा प्रसार, संघटनात्मक बळकटी आणि राष्ट्रसेवेची ज्वाला प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये उजळवण्याचे माध्यम आहे. २०२६ मध्ये आपण सर्व मिळून संघटन अधिक सशक्त, शिस्तबद्ध आणि विचारनिष्ठ बनवू, असा संकल्प आहे.
– संजय पटनी, वरिष्ठ उपाध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.





