सरकारी मोजणीला हरकत घेतल्याने एकास बेदम मारहाण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/arrest-handcuffs-p_f0199cf2-bad9-11e9-b579-c3deb206504f.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
सरकारी मोजणीला हरकत घेतल्याने दोघांनी एकाला बेदम मारहाण केली. जखमी व्यक्तीची कंपनी पेटवून देतो असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी (दि. 22) दुपारी एक वाजता खराबवाडी येथे घडला.
राहुल नामदेव माने (वय 36, रा. मोशी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भाऊसाहेब चंद्रकांत खराबी, दिपराज भाऊसाहेब खराबी (रा. खराबवाडी, चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगळवारी दुपारी त्यांच्या दुकानासमोर कामगारासोबत बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. फिर्यादी यांनी सरकरी मोजणीला हरकत घेतल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना डोक्यात, गालावर, छातीवर, ओठावर मारून दुखापत केली. तसेच फिर्यादी यांची कंपनी जाळण्याची तसेच त्यांना ठार मारण्याची आरोपींनी धमकी दिली. या भांडणात फिर्यादी यांचे कपडे फाटून 500 रुपयांचे नुकसान झाले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.