बालदिनानिमित्त मुलांनी केली मेट्रोची स्टेशनची सहल
![On the occasion of Children's Day, the children took a trip to the metro station](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/pjimage-2021-11-13T181953.564.jpg)
पिंपरी चिंचवड | महा मेट्रो आणि फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाल दिनानिमित्त मुलांना आज (शनिवारी) मेट्रो स्टेशनची सहल घडविली. संत तुकारामनगर येथील मेट्रो स्टेशन, मेट्रो विषयी माहिती मुलांना देण्यात आली.पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक शाळांमधील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. डी. वाय. पाटील स्कूल, ज्ञान प्रबोधनी, वंडरलैंड, सिटी प्राईड, वसंतदादा पाटील, जीजी इंटरनॅशनल, संत साई माने स्कूल, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल, जे. एस. पी. एम स्कूल, केंब्रिज स्कूल, माऊंट एव्हरेस्ट इंटरनॅशनल स्कूल, टाटा मोटर्स विद्यानिकेतन इत्यादी शाळेचे विद्यार्थी-पालक उपस्थित होते.
इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर, महामेट्रोचे उपमहाव्यवस्थापक मनोज कुमार, महा मेट्रोचे अभियंता अमोल मुडळे, अमोल देशपांडे उपस्थित होते. मेट्रो विषयी संपूर्ण माहिती बाल मित्रांना देण्यात आली. याप्रसंगी खाऊचे वाटप देखील मुलांना करण्यात आले. दरम्यान प्रश्न मंजुषा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीज असोसिएशनचे भोर यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या.