नागरिकांसाठी भर पावसात ‘ऑन फिल्ड’
पवना नदी पूरस्थिती : नागरिकांना सहकार्य आणि दिलासा

पिंपरी | पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे कासारवाडी परिसरातील पवना नदी ओसंडून वाहत आहे. या संकटाच्या काळात, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा जवळकर या नागरिकांसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरल्या असून, झोपडपट्टी भागात जाऊन त्यांनी लोकांना दिलासा दिला आहे.
सोमवारपासून पिंपरी चिंचवड शहरात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. याचा परिणाम कासारवाडी भागातील कारळे चाळ, हिराबाई झोपडपट्टी आणि वंजारी चौक भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. याची दखल घेत सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा जवळकर यांनी या भागांना भेटी देत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू केले. त्यांनी प्रशासनाच्या पथकांबरोबर समन्वय साधत गरजूंना मदत पोहचवण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा : देवकर प्लाझा फसवणूक प्रकरण : ५४.५० लाख रुपयांची फसवणूक
नदीकाठच्या नागरिकांनी घाबरू नये. प्रशासन सज्ज आहे आणि आम्ही सामाजिक कार्यकर्ते तुमच्या पाठीशी आहोत. आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्यात येईल. नागरिकांनी फक्त सतर्क राहावे,असे आवाहन प्रतिभा जवळकर यांनी केले.





