NRC\CAB विरोधात संताप : पिंपरीत इनकलाब जिंदाबाद म्हणून भाजप सरकारचा निषेध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Screenshot_20191220-151344.png)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
लोकसभा व राज्यसभेमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (सीएए) मंजूर केल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. आता पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सामाजिक संघटनांनी सुध्दा या विधेयकाच्या विरोधात आज पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोठ्या प्रमाणात आंदोलन केले.
हे विधेयक राज्यघटनेच्या ,कलम १४ व १५ उल्लंघन असा आक्षेप एमआयएमने घेतला आहे. केंद्र सरकार भविष्यात राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर (एनआरसी) देखील आणणार आहे. दोन्ही गोष्टी एका विशिष्ट समाजाच्या व भारतीय संविधानाच्या विरोधात असून एका विशिष्ट समाजाला त्रास देण्यासाठी जाणीव पूर्वक हा कायदा बनवण्यात आला असल्याचा आरोप पिंपरीतील एमआयएमने केला आहे.
![](https://i2.wp.com/mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Screenshot_20191220-151436.png?fit=1024%2C576&ssl=1)
या विधेयकाच्या निषेधार्त पिंपरी- चिंचवड परिसरातील मुस्लिम समाज व अन्य सामाजिक संघटनांच्या वतीने शुक्रवारी (दि. २०) दुपारी आडीचच्या सुमारास जोरदार आंदोलन केले. या आंदोलनासाठी विधेयकाच्या विरोधातील आंदोलकांची मोठी गर्दी झाली होती. इनकलाब जिंदाबाद… अशा घोषणा देऊन केंद्रातील या निर्णयाचा निषेध करण्यात आला.
![](https://i1.wp.com/mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Screenshot_20191220-151426-1.png?fit=1024%2C576&ssl=1)