हिंजवडीतील जिल्हा परिषद शाळेत ‘नो पॅरेंट, नो एक्झिट’ नियम
-विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षकांकडून उपाय : अपघातानंतर सतर्कता

पिंपरी : हिंजवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षकांनी विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. सकाळच्या सत्रात शाळा भरल्यानंतर विद्यार्थ्यांना विनापरवानगी गेटच्या बाहेर जाण्यास मनाई केली आहे. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना पालकांकडे सुपूर्द केल्यावरच बाहेर सोडले जात आहे.
पंधरा दिवसांपूर्वी वाकड रस्त्यावर असलेल्या पंचरत्न चौकातील भीषण अपघातात जिल्हा परिषद शाळेतील तीन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या रस्ते सुरक्षेसाठी शाळेकडून घेतलेल्या कडक भूमिकेचे परिसरात कौतुक होत आहे. सायंकाळी साडेपाचला शाळा सुटल्यावर केवळ २० मिनिटात येथील प्रमुख चौक आणि रस्ते पार करून बहुतांश विद्यार्थी घरी जात असतात.
हेही वाचा – एकनाथ शिंदेची मोठी घोषणा ! सिडकोच्या घरासंदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय
आयटीपार्कच्या मुख्य वेळेत वाहतूक नियमन करण्यासाठी शिवाजी चौकासह परिसरात वाहतूक पोलिस आणि वॉर्डन तैनात असतात. त्यामुळे, शाळा सुटल्यावर थोडा वेळ वाहतूक पोलिसांनी विद्यार्थ्यांना चौक, रस्ता ओलांडताना सहकार्य करावे, अशी अपेक्षा पालक व्यक्त करत आहेत. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिवसभर वाहनांची वर्दळ असते. सायंकाळी गावठाण रस्ता, माण, मारुंजी आणि वाकड रस्त्यावर रहदारीमुळे चालणेसुद्धा अवघड असते. याच चौकात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
शाळा सुटल्यावर शेवटचा पालक येईपर्यंत आम्ही सर्वजण शाळेच्या आवारात थांबलेलो असतो. शाळेत येताना आणि जाताना विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे.
-बापू येळे, मुख्याध्यापक, हिंजवडी




