पिंपरी चिंचवड न्यायालयात नवनियुक्त न्यायाधीश पी. सी. फटाले यांची नियुक्ती
![Newly appointed Judge P. in Pimpri Chinchwad Court. C. Appointment of Fatale](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/IMG-20210609-WA0634.jpg)
पिंपरी – पिंपरी चिंचवड न्यायालयात नवनियुक्त न्यायाधीश पी. सी. फटाले साहेब यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशनचे अध्यक्ष. ॲड गोरखनाथ झोळ व सदस्य ॲड. प्राची शितोळे यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यावेळी पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायालयाधिश मा सुपेकर साहेब , पठाण साहेब ,मा. काळे साहेब , मा. भोसले साहेब यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशन, उपध्याक्ष ॲड पांडुरंग शिनगारे, सचिव ॲड महेश टेमगिरे,सह सचिव ॲड अनिल शिंदे,खजिनदार ॲड हरिष भोसुरे,ॲाडिटर ॲड धंनजय कोकणे,सदस्य ॲड ऋतुराज आल्हाट,ॲड मंगेश नढे,ॲड कृष्णा वाघमारे यांनी केले.
यावेळी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशन चे अध्यक्ष ॲड गोरखनाथ झोळ,माजी अध्यक्ष ॲड संजय दातीर पाटिल,ॲड विलास कुटे , ॲड सुनील कडुसकर, ॲड दिनकर बारणे, महाराष्ट्र आणि गोवा शिस्तपालन समिती सदस्य ॲड अतिश लांडगे, ॲड.प्रताप कडूस, व इतर वकिल मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार ॲड महेश टेमगिरे यांनी केले.