ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

घरगुती गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

पिंपरी चिंचवड | घरगुती गॅस दरवाढीच्याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आज (शनिवारी) आंदोलन केले. दरवाढ मागे घेऊन घरगुती गॅसला किमान पंचवीस टक्के अनुदान देण्याची मागणी केली.शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी पक्षनेते जगदिश शेट्टी, नगरसेविका संगिता ताम्हाणे, गिता मंचरकर, स्वाती काटे, अनुराधा गोफणे, महिला शहर कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, पुणे जिल्हा निरीक्षक कविता आल्हाट, ओबीसी महिला सेल शहराध्यक्षा सारिका पवार तसेच विधानसभा शहराध्यक्षा संगिता कोकणे, मनिषा गटकळ, सहकार्याध्यक्षा सविता धुमाळ, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, माजी नगरसेवक उत्तम हिरवे, प्रसाद शेट्टी, ज्येष्ठ कार्यकर्ते तारीक रिझवी, देविदास गोफणे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष युसूफ कुरेशी, उपाध्यक्ष अशपाक शेख, विजय दळवी, दिपक साकोरे, तसेच सुर्वणा कांबळे, फहमिदा जावेद शेख, मुमताज इनामदार, अनिता गायकवाड, उज्ज्वला ढोरे, वैशाली पवार, सोनाली जाधव, ज्योती गोफणे, रजीना फॉन्सीस, शितल जाधव, आरती जाधव, ज्योती निंबाळकर, सुंगधा पाषाणकर, सपना घाडगे, सारिका ढमे, स्वप्नाली आसावले, कमल मस्के, अर्चना राऊत, भारती कदम, नमिषा जटार, सुमन कांबळे, दिपा देशमुख, पुनम वाघ, वैशाली पवार, मोनिका जॉन्सन, पार्वती पवार, धर्मावती गुप्ता, वैशाली मिडगुले, संगीता वंजाळकर, पुष्पा पिटर, कोमल कवडे, अंकिता साबळे, उषा चिंचवडे, अनिता गायकवाड, मंगल ढगे, अश्विनी पोळ आदी उपस्थित होत्या.

महागाईने उच्चांक गाठला असतानाच केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या किंमतीत पंचवीस रुपयांनी वाढ केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी या दरवाढीचे केलेले समर्थन अतिशय हास्यास्पद आहे. राष्ट्रीय स्तरावर इव्हेंट मॅनेजमेंट करुन सुरु केलेली उज्ज्वला गॅस योजना फसली आहे. यावरचे अनुदान देखील मिळणे आता बंद झाले आहे. केंद्र सरकारचे अपयश झाकण्यासाठी सर्व सामान्य नागरीकांच्या करातून जमा झालेल्या निधीचा इव्हेंट मॅनेटमेंटसाठी उपयोग करुन स्व:ताची छबी वारंवार नागरीकांपुढे आणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिला भगिनी तीव्र निषेध करीत आहे, असे महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button