पिंपरी / चिंचवड

प्रभाग ५ मध्ये भाजपा उमेदवारांची विकासाच्या मुद्यांवर प्रचारात आघाडी!

मिशन-PCMC : कविता भोंगाळे यांचा आवाहन विकासासाठी ‘‘कमळ’’ ला साथ द्या!

पिंपरी-चिंचवड: गवळीनगर- चक्रपाणी वसाहत प्रभाग क्रमांक ५ मधील नागरिकांना विकासाचा अनुभव देत, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी आपली निवडणूक लढाई ठामपणे सुरू केली आहे. उमेदवारांनी कामावर विश्वास ठेवून आणि जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याची ग्वाही दिली आहे.

सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या अ- अनुराधा देविदास गोफणे यांनी सांगितले की, “माझ्या प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि प्रभागाची निरंतर सेवा यावर लक्ष केंद्रित करून समाजसेवेच्या माध्यमातून मी काम करत आहे. आमदार पैलवान श्री. महेशदादा लांडगे, श्री. सचिन भैय्या लांडगे व श्री. कार्तिक सर लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री. सागर भैय्या गवळी, श्री. जालिंदर बापू शिंदे व सौ. अनुराधा ताई गोफणे यांच्या सहकार्याने प्रभाग विकासाच्या शिखरावर पोहचेल, याची ग्वाही मी देतो/देते.”

उमेदवारांनी प्रभाग क्रमांक ५ मधील नागरिकांना भाजपाचे सर्व उमेदवार ‘कमळ’ 🪷 या चिन्हासमोरील बटनावर प्रचंड मताने दाबून विजयी करण्याचे आवाहन केले आहे. उमेदवारांची यादी अशी आहे – अ- अनुराधा देविदास गोफणे, ब- सागर बाळासाहेब गवळी, क- कविता भोंगाळे, ड- जालिंदर किसन शिंदे

हेही वाचा –  पिंपळे सौदागर- रहाटणीतील मतदारांचा भाजपवर विश्वास : शत्रुघ्न काटे

भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने चर्होलीत राज्य सरकारच्या आयटी धोरणाची अंमलबजावणी सुरू असून, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीचे डेटा सेंटर आणि औद्योगिक प्रदर्शन केंद्र प्रगतीपथावर आहेत. शहरातील गृहनिर्माण सोसायटी व उद्योग–व्यापार क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा सक्षमीकरणावर भर दिला जात आहे. या विकासामुळे पिंपरी-चिंचवडची ओळख इंडस्ट्रियल–कमर्शिअल बिझनेस सेंटर म्हणून अधिक दृढ होत आहे.

शहरातील निर्णय शहरातच होण्याची संकल्पना अधोरेखित करत, भाजप उमेदवारांनी नागरिकांना “स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकर म्हणून कमळाचे बटन दाबून भाजपाला निवडून द्या” असे आवाहन केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“प्रत्येक नागरिकाचा आवाज ऐकून, प्रभागाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करणे ही माझी प्राथमिकता आहे. प्रामाणिक मेहनत, समर्पण आणि जनतेच्या विश्वासावर आधारित कामामुळेच प्रभाग उज्वल भविष्यात पोहोचेल.”

– कविता भोंगाळे, उमेदवार,भाजपा, प्रभाग- 5, गवळीनगर- चक्रपाणी वसाहत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button