पिंपरी-चिंचवड अहिल्यादेवी सेवा संघाच्या अध्यक्षपदी नवनाथ बिडे
उपाध्यक्षपदी व्हनमाने,सरोदे तर कार्याध्यक्षपदी सरक यांची निवड
पिंपरी : सांगवी – पिंपळे गुरव अहिल्यादेवी सेवा संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पाडली. यावेळी संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी नवनाथ बिडे, उपाध्यक्षपदी बिरु व्हनमाने ,अंकलेश सरोदे यांची तर कार्याध्यक्षपदी सचिन सरक यांची निवड करण्यात आली.
पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृहात संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत गोफणे, माजी अध्यक्ष अभिमन्यु गाडेकर , बाबासाहेब चितळकर , विनायक पिंगळे, मधुकर लंभाते,अजय दूधभाते, विजय वाघमोडे बळीराम घोडके,मनोजकुमार मारकड, संदीपान सामसे यांच्यासह सर्व माजी पदाधिकारी, संस्थापक सदस्य, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा – मनोज जरांगे पाटील यांची रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये शांतता रॅली
संघाचे अन्य पदाधिकारी
डॉ. दिनेश गाडेकर (खजिनदार)
सुनील पांढरे (सह-खजिनदार)
रामेश्वर हराळे (सचिव)
सूरज गोटके(सह -सचिव)
महादेव मासाळ ( प्रसिद्धी प्रमुख)
अंबादास पडळकर (संपर्क प्रमुख पिंपळे गुरव विभाग)
वैजिनाथ सुरवसे (संपर्क प्रमुख नवी सांगवी विभाग)
संतोष भुरे (सह-संपर्क प्रमुख नवी सांगवी विभाग )
अरविंद काळे (संपर्क प्रमुख जुनी सांगवी विभाग)
भारत भिटे ( पुतळा स्वच्छता प्रमुख)
संघाच्या कार्यकारिणी सदस्यांमध्ये
रमेश गाढवे, राजेंद्र येडे ,निलेश गाडेकर,अक्षय तिगाडे,संतोष मदने ,आकाश कोरडे,धनाजी येडगे आदींचा समावेश आहे.