Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी उमेदवार विकास साने यांनी गुन्हेगारी माहिती लपवल्याचा आरोप

विकास साने यांच्या अडचणीत वाढ : भाजपाचे उमेदवार सुरेश म्हेत्रे यांचा गंभीर दावा

पिंपरी–चिंचवड । प्रतिनिधी

चिखली प्रभाग क्रमांक १ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विकास साने यांनी त्यांच्या निवडणूक अर्जात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा आरोप भाजपाचे उमेदवार सुरेश म्हेत्रे यांनी केला आहे. प्रतिज्ञापत्रात ५ ते ७ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकणाऱ्या गुन्ह्यांचा उल्लेख न केल्याचा हा प्रकार असून, तो कायद्याने दंडनीय असल्याचे म्हेत्रे यांनी स्पष्ट केले.

म्हेत्रे यांनी सांगितले की, निवडणूक अर्जामध्ये चुकीची माहिती देणे अथवा माहिती लपवणे हा गंभीर गुन्हा असून, अशा परिस्थितीत संबंधित उमेदवाराचा अर्ज बाद होऊ शकतो. याबाबत स्थानिक निवडणूक अधिकारी व राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, मुंबई उच्च न्यायालयात देखील दावा नोंदवण्यात आला आहे. संबंधित उमेदवाराला कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा      :            कुणाला १, कुणाला ५, कुणाला १०, कुणाला १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंचा गंभीर आरोप 

तक्रारीनुसार, आरोपीने फिर्यादीची फसवणूक करून तोतया व बनावट सही वापरून खोटे प्रतिज्ञापत्र तयार केले आहे. हे प्रतिज्ञापत्र खरे असल्याचे भासवून फिर्यादी व त्यांच्या मयत वडिलांच्या जमिनीवरील हक्क बळकावण्याचा व हडप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मे. कोर्टास BNS Act कलम 175(3) अन्वये फिर्याद नोंदविण्याचे संपूर्ण अधिकार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शपथेवर खोटी माहिती दिल्याबद्दल गरज भासल्यास फौजदारी तक्रार दाखल करण्याचा विचार सुरू असल्याचे सुरेश म्हेत्रे यांनी सांगितले. “लोकशाहीत मतदार राजा असतो. मात्र मतदारांची फसवणूक करणाऱ्यांचा उमेदवारी अर्ज रद्द होणे अपेक्षित आहे,” असे ते म्हणाले.

“निवडणूक प्रक्रियेत आलेल्या तक्रारींचे कायद्यानुसार पूर्णपणे परीक्षण होणे आवश्यक आहे. सत्य तपासून योग्य ती कार्यवाही होईल याची आम्ही दक्षता घेणार आहोत. जागरूक नागरिक, सक्षम न्यायव्यवस्था आणि पारदर्शी निवडणूक हीच खरी लोकशाहीची ताकद आहे.”

– सुरेश म्हेत्रे, उमेदवार, भाजपा, प्रभाग- 1 चिखली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button